हायटेक बसस्थानकाचे काम करणाऱ्या ठेकेदाराकडून ५० टक्के दरवाढीची मागणी

रत्नागिरी:-  गेल्या तीन वर्षांहून अधिक काळ रत्नागिरी हायटेक बसस्थानकाचे काम रखडले आहे. सुरुवातीला कोरोनामुळे काम थांबविण्यात आले होते मात्र त्यानंतर ठेकेदारांनी १० कोटी बजेटमध्ये काम पूर्ण होणार नाही त्यामुळे हे बजेट ५० टक्क्यांनी वाढवून द्यावे, असे पत्र एसटी महामंडळाकडे सादर केले आहे. या मागणीवर या आठवडाभरात योग्य निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती महामंडळाकडूनच समोर आली आहे. 

सहा सात वर्षांपूर्वी एसटी बसस्थानकाचे कामाचे टेंडर निघाले. होते ते १७ कोटींचे होते. मात्र त्यानंतर सरकार बदलले आणि टेंडरही बदलले आणि १० कोटींचे टेंडर निघाले, कोरोना नंतर बांधकाम मटेरियलचे सर्वच दर वाढले असून १० कोटी बजेट अपूर्ण आहे यामध्ये ५० टक्के वाढ करुन द्यावी, अशी मागणी ठेकेदारांनी केली. आहे . हे पत्र त्यानी काही महिन्यांपूर्वीच महामंडळाच्या अध्यक्षांकडे सादर केलेले आहे. मात्र अद्यापही यावर तोडगा काढण्यात आलेला नाही. मात्र या आठवडाभरात यावर निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

सत्तर कामे बजेटवाढीमुळे प्रलंबित 

महाराष्ट्रातील एसटी जवळपास ७० कामे बजेट वाढीच्या मागणीमुळे रखडले असल्याची धक्कादायक माहिती महामंडळाकडून समोर आली आहे. ठेकेदार असोसिएशनकडून बजेट वाढवून देण्याची मागणी केल्याने ही सर्व कामे बंद ठेवण्यात आली आहेत . केवळ महाराष्ट्रातील २३ बसस्थाकांचे काम पूर्ण झाले आहे .