राजिवड्यात १९ वर्षीय तरुणाची आत्महत्या

रत्नागिरी:-शहरातील राजिवडा येथे भाट्ये पूलाजवळ १९ वर्षीय तरुणाने दोरीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केली. गुरुवारी दुपारी ११.३० वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली.

मुस्तकी मुजावर यांनी शहर पोलीसांना दिलेल्या माहितीनुसार मोहिन मल्लीक मुजावर यांने आपल्या राजिवडा येथील रहात्या घरी पंख्याला नायलॉनच्या दोरीने गळफास लावून आत्महत्या केली. मोहिन बराच वेळ बाहेर न आल्याने नातेवाईक त्याला पहाण्यासाठी आतील खोली गेल्यानंतर त्याने आत्महत्या केल्याचे लक्षात आले.

भाऊ मुस्तकी मुजावर यांनी शहर पोलीसाना याची माहिती दिल्यानंतर पोलीसांनी घटनास्थळी जावून पंचनामा करुन मृतदेह ताब्यात घेतला. मात्र मोहिनने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.