व्यापाऱ्यांना लुटणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळल्या 

रत्नागिरी:-सोने तपासणी करण्याचे हॉलमार्क मशिन खरेदी करण्यासाठी केरळला रेल्वेने निघालेल्या व्यापार्‍यांकडील २७ लाख ८६ हजार रूपयांंची रोकड असणारी बॅग घेऊन पळालेल्या ६ संशयितांना पकडण्यात शहर पोलिसांना यश आले आहे.

रत्नागिरी रेल्वे स्थानकातून केरळला निघालेल्या २ व्यापार्‍यांनी १ मे रोजी जामनगर तिरूवल्ली एक्सप्रेसने निघाले होते. त्यामध्ये प्रशांत भिमराव माने व रावसाहेब माहीम असे या व्यापार्‍यांचे नाव आहे. या व्यापार्‍यांकडील २७ लाख ८६ हजार रूपये रोकड असणारी बॅग रेल्वे प्रवासात अवघ्या १० मिनिटात चोरीला गेली होती.

त्यांची ट्रेन कणकवलीजवळ आली असता आपल्याकडील बॅग गायब झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. लाखो रूपयांची रोकड असणारी बॅग चोरीला गेल्याने या व्यापार्‍यांनी ८ मे रेाजी शहर पेालीस स्थानकात तक्रार दिली होती. या तक्रारीवरून पोलिसांनी भा.दं.वि.क. ३७९ अन्वये गुन्हा दाखल केला होता.

या गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांच्या आदेशानुसार शहर पोलिसांची एक विशेष टीम तयार करण्यात आली. टेक्निकल पुरावे गोळा करून या टीमने थेट केरळ गाठले होते आणि त्यानंतर या प्रकाराचा उलगडा झाला.

या प्रकरणात एकूण ६ आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून १०० टक्के रक्कम रिकव्हर करण्यात शहर पोलिसांना यश आले आहे. ही कामगिरी यशस्वीपणे पार पाडणार्‍या शहर पोलिसांच्या पथकाला पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी २५ हजार रूपयांचा रिवॉर्ड जाहीर केला आहे.

ही कामगिरी डॉ. मोहितकुमार गर्ग, अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, डीवायएसपी सदाशिव वाघमारे, पोलीस निरीक्षक विनीत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली डिबी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक शांताराम महाले, पोलीस उपनिरीक्षक आकाश साळुंखे, पो.हे.कॉ. प्रवीण बर्गे, पो. ना. गणेश सावंत, पो.ना. विलास जाधव, पो. ना. सावंत, पो. ना. भालोकर, पो. ना. नार्वेकर आदींनी केली