तीन दिवसांपासून हापूस रेल्वे स्थानकावर पडून; आंबा बागायतदारांची नुकसान भरपाईची मागणी

रत्नागिरी:-रत्नागिरीच्या हापूस आंबा बागायतदारांची थेट कोकण रेल्वेकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे, तसेच ग्राहक कोर्टात जाण्याचा इशारा देखील दिला आहे. गेल्या 3 दिवसापासून हापूस आंब्याची वाहतूक न झाल्याने आंबा खराब होण्याची शक्यता आहे. याबाबत आंबा बागायतदारांनी रत्नागिरी रेल्वेस्थानक प्रमुखांना पत्र लिहत ग्राहक कोर्टात जाण्याचा इशाराही दिला आहे. या पत्राद्वारे तब्बल 2 लाख 24 हजार 400 रुपये नुकसान भरपाईची मागणी करण्यात आली आहे

मागील 3 दिवसापासून हापूस आंबा रत्नागिरी रेल्वे स्थानकातच पडून

कोकण रेल्वेकडून आंबा वाहतूक देखील केली जाते. पण आता कोकणातील आंबा शेतकऱ्याने थेट कोकण रेल्वेकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे. नियमानुसार पैसे भरले पण हापूसची वाहतूक कोकण रेल्वेमार्फत वेळेत केली गेली नाही. परिणामी नुकसान होणार असून 2 लाख 24 हजार आणि 400 रुपयाची नुकसान भरपाई द्यावी, अन्यथा ग्राहक मंचाकडे दाद मागितले जाईल अशा आशयचे पत्र समीर दामले या शेतकऱ्याने रत्नागिरी रेल्वे स्थानक प्रमुखांना लिहले आहे.

ग्राहक मंचाकडे दाद मागण्याचा निर्णय

कोकणातील हापूस दक्षिणेकडील राज्यांमध्ये पाठवायचा आहे. त्यासाठी कोकण रेल्वेची मदत घेतली गेली. बुकिंग करत नियमानुसार पैसे देखील भरले गेले, पण मागील 3 दिवसापासून हापूस आंबा रत्नागिरी रेल्वे स्थानकात पडून आहे. त्यामुळे हापूस आंबा शेतकऱ्याने थेट पत्र लिहत नुकसान भरपाईची मागणी करत ग्राहक मंचाकडे दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे.