जिल्हा पोलीस दलातील एक अधिकारी, दहा पोलीस अंमलदार यांचा पोलीस महासंचालक सन्मानचिन्हाने सन्मान 

रत्नागिरी:-रत्नागिरी जिल्हा पोलीस दलामध्ये कार्यरत असताना उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल रत्नागिरी जिल्हयातील १ पोलीस अधिकारी व १० पोलीस अंमलदार यांना मा.पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांनी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधुन पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह प्रदान केले आहे.

पोलीस दलामध्ये विशेष शाखेमध्ये ०५ वर्षे उत्तम कामगिरी केल्याबद्दल पोलीस निरीक्षक सुरेश गावीत ( बाणकोट पोलीस ठाणे ) यांना , मोटार परीवहन विभागामध्ये विनाअपघात २० वर्षे सेवा अभिलेख उत्तम राखल्याबद्दल चालक सहा . पोलीस उपनिरीक्षक सतिश विठ्ठल साळवी ( रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाणे ) यांना तसेच मागील १५ वर्षे सेवेचा अभिलेख उत्तम राखलेबद्दल सहा . पोलीस उपनिरीक्षक जगदीश चंद्रकांत करगुटकर ( वाचक शाखा ) पोहवा उदय आनंदा चांदणे ( दहशतवाद विरोधी पथक ) पोहवा प्रविण पुरुषोत्तम वीर ( रत्नागिरी शहर पोलीस ठाणे ) , पोहवा प्रमोद तुकाराम कांबळे ( वाचक शाखा ) पोहवा दिपक अशोक चव्हाण ( उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय , रत्नागिरी ) , पोहवा दिपक भिकाजी पवार ( वाचक शाखा ) पोहवा अमोल अरुण गमरे ( सायबर पोलीस ठाणे ) पोना गुरुप्रसाद सुधीर महाडीक ( आर्थिक गुन्हे शाखा ) , पोना वैभव गजानन मोरे ( रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाणे ) यांना मा.पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांनी सन्मानचिन्ह प्रदान केले असल्याने सन्मानचिन्ह प्राप्त सर्व अधिकारी व अंमलदार यांचे रत्नागिरी जिल्हयाचे पोलीस अधीक्षक डॉ . मोहित कुमार गर्ग ( भा.पो.से. ) यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.