कोकणाच्या शैक्षणिक विकासासाठी माझ्यावर उच्च व तंत्र शिक्षण खात्याची जबाबदारी: ना. सामंत

रत्नागिरी:- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उच्च व तंत्रशिक्षण मंत्रीपद मला का दिले हे आज कळले. कोकणातील शैक्षणिक उणीवा भरून निघाव्या. पुणे, विदर्भ, मराठवाड्या प्रमाणे कोकणाचा शैक्षणिक विकास व्हावी, यासाठी ही जबाबादारी माझ्यावर टाकली.  आज ३० कोटीचे महाराष्ट्रातील पहिले कौशल्य विकास केंद्राचे भूमिपुजन झाले.  भविष्यात येथील उद्योजकांना त्या-त्या क्षेत्रात कौशल्य असणारे तरूण मिळतील आणि ही देखील उणीव भरून नोकऱ्या मिळतील. मात्र काही विद्वान आहेत, त्यांना शाश्वत विकास म्हणजे काय ते कळलेच नाही. अशा फुटकळ लोकांचा विचार न करता रत्नागिरी आणि कोकणाचा विकास हेच ब्रिद वाक्य घेऊन मी काम करत राहणार, अशी कोपरखळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी मारली.

येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या आवारात महाराष्ट्रातील पहिले कौशल्य विकास केंद्राच्या इमारतीच्या भुमिपुजन समाऱंभात ते बोलत होते. यावेळी तंत्रक्षिण संचालनालयाचे अभय वाघ, जेएसडब्ल्यूचे श्रीकांत दवे, उद्योजक दीपक गद्रे, कॅप्टन दीलप भाटकर, एमआयडीसी असोसिएशनचे दिगंबर मगदुम, डॉ. विनोद मोहितकर, राज्यातील उद्योजक आणि महाविद्यालयी विद्यार्थी उपस्थित होते.
उदय सामंत म्हणाले, महाविद्यालयातील परीक्षा आता ऑनलाईन नाही, तर ऑफलाईनच होतील. ऑफलाईन परीक्षामुळेच विद्यार्थी घडणार आहेत. मात्र ऑनलाईन परीक्षांमुळे विद्याथ्यांचे भविष्य अंधारात जाईल. कोरोना काळात विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला आम्ही महत्त्व दिले.

विद्यार्थ्यांचा विचार करणारे हे आघाडी सरकार आहे. रत्नागिरीच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी अतिशय महत्त्वाचा दिवस आज आहे. महाराष्ट्रातील ३० कोटीच्या पहिल्या केंद्राचे भूमिपूजन झाले तरी हा विकास शाश्वत आहे की नाही, याची देखील आमच्या रत्नागिरीमध्ये चर्चा होऊ शकते. अशा लोकांना विद्यार्थ्यांनी दिली पाहिजे. या कौशल्य विकास केंद्रातील विद्यार्थी-विद्यार्थिनी शिकून बाहेर पडेतील तेव्हा त्यांना थेट नोकरी मिळणार आहे. अनेक उद्योजक रत्नागिरीत येतात आणि काही वर्षांमध्ये ८० टक्के रोजगार देण्याचे आश्वासन देतात. काही वर्षांमध्ये ते ४० टक्के देखील पाळले जात नाही. उद्योजकांना माझी एवढीच विनंती आहे की भविष्यात स्किल असलेले तरूण तुम्हाला रत्नागिरीत मिळतील आणि ही उणीव ही भरून निघेल. रत्नागिरीमध्ये उद्योजकांना पाहिजे तेच शिक्षण असुदे, टेक्नॉलॉजी असुदे, एग्रीकल्चर असू दे किंवा दहावी नापास झालेल्या विद्यार्थ्यांना देखील आता कमीपणा वाटून घेण्याची आवश्यकता नाही. या केंद्रामध्ये चांगला पद्धतीचा अभ्यास करू ते स्वतः देखील स्वतःच्या पायावर उभा राहू शकतो एवढं चांगलं शिक्षण त्या सेंटरमधुन मिळणार आहे.
शाश्वत विकास म्हणजे काय हे अनेकांना कळले नाही. केंद्राचे महत्व पाच वर्षांत कळेल. रत्नागिरी शहरात विविध ठिकाणचे ३ हजार विद्यार्थी येथील. त्याअनुषंगाने अनेकांना रोजगार मिळणार आहे. शाश्वत विकासबाबत टीका करणाऱ्या फुटकळ लोकांबद्धल मी काही बोलणार नाही. कारण आता पालिकेच्या निवडणुक आल्याने त्यांची कोल्हेकुई सुरू झाली आहे. परंतु मी विकासाचे ब्रिद वाक्य घेऊन माझे काम सुरूच ठेवणार. रत्नागिरीत आता एव्हिएशन कोर्सेस सुरू करण्याच्यादृष्टीने आमचा प्रयत्न सुरू आहे, असेही श्री. सामंत म्हणाले.