भारत शिक्षण मंडळाच्या अध्यक्षपदी नंदकुमार साळवी तर कार्याध्यक्ष पदावर नमिता कीर बिनविरोध

रत्नागिरी:-भारत शिक्षण मंडळाच्या २०२२ ते २०२५ या त्रिवार्षिक निवडणूकीमध्ये अध्यक्ष म्हणून नंदकुमार शंकरराव साळवी, कार्याध्यक्ष म्हणून नमिता रमेश किर, उपाध्यक्ष म्हणून दिनकर शंकरराव पटवर्धन, डॉ. अलिमिया दाऊद परकार बिनविरोध निवडून आले आहेत.

उपकार्याध्यक्ष म्हणून श्रीराम अनंत भावे, चंद्रकांत सोनू घवाळी, विश्वस्त म्हणून चंद्रशेखर मुरलीधर करंदीकर, डॉ. चंद्रशेखर जगन्नाथ केळकर यांची बिनविरोध निवड झाली आहे.

 कार्यवाह पदासाठी झालेल्या निवडणूकीमध्ये सुनील गणपत वणजू विरुध्द शशांक श्रीकृष्ण गांधी या निवडणुकीमध्ये सुनील वणजू यांनी ८८ मते घेवून विजयी झाले. तर प्रतिस्पर्धी शशांक गांधी यांना ७९ मते मिळाली. सहकार्यवाह पदांच्या २ पदांसाठी विनय वसंत परांजपे, संजय विष्णू जोशी व केशव आण्णा गायकवाड असे तिघेजण उभे होते. यामध्ये विनय वसंत परांजपे , संजय विष्णू जोशी निवडून आले असून या तिघांना अनुक्रमे ९७,८७,८३ मते मिळाली. खजिनदार पदासाठी नचिकेत निळकंठ जोशी व विश्वनाथ किसन शिंदे उभे होते. यामध्ये नचिकेत जोशी यांना ८८ मते मिळून विजयी झाले तर प्रतिस्पर्धी विश्वनाथ शिंदे यांना ७३ मते मिळाली. सदस्यपदी अनंत मुकुंद आगाशे , नित्यानंद रवींद्र भुते , संजय अनंत चव्हाण , धनेश रामकृष्ण रायकर , विनायक कृष्णा हातखंबकर , श्रीकृष्ण महादेव दळी , संतोष श्रीधर कुष्टे यांची तर शिक्षक प्रतिनिधी म्हणून संदीप शंकर कांबळे तर शिक्षकेतर प्रतिनिधी म्हणून रवींद्र गोंविंद साखरपेकर यांची निवड करण्यात आली आहे . निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ॲड. डी. ए. आठवले यांनी काम पाहीले.