पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या ताफ्यातील गाड्यांचा अपघात; सिंधुदुर्गहून रत्नागिरीला येतानाची घटना

रत्नागिरी:- कोकण दौऱ्यावर असलेल्या पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या ताफ्यातील तीन गाड्यांना अपघात झाला आहे. खारेपाटण चेकपोस्ट नजीक हा अपघात झाला आहे. मात्र या अपघातात कोणालाही इजा झाली नसल्याचे कळते


 मंत्री आदित्य ठाकरे सिंधुदुर्गवरून रत्नागिरीला जात असताना हॉटेल मधुबन या ठिकाणी सकाळी 11.30 च्या सुमारास हा अपघात घडला. यामध्ये आदित्य ठाकरे यांच्या गाडीच्या मागे एका गाडीने ब्रेक मारला असता ताफ्यातील तीन गाड्या एकमेकांवर आढळून हा अपघात झाला. या अपघातात हॉटेल मधुबन नजीक झाला. यात कोणी जखमी झाले नसले तरी गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे.