मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या चार वाहनांचा खेडनजीक विचित्र अपघात

रत्नागिरी:- मुंबई-गोवा महामार्गावरील भरणे-गवळीवाडीनजीक रिलायन्स पेट्रोल पंपासमोर बुधवारी रात्री चार वाहनांच्या विचित्र अपघात झाला. या अपघातात तिघेजण गंभीर जखमी झाले. ही चारही वाहने मुंबईहून खेडच्या दिशेने जात होती.

शौकत अली जुईकर (40, खेड), नितीन दौलत चव्हाण (32, कुळवंडी), दाऊ द हसन शेख (38, भोस्ते), परेश अनंत निकम (27, कुळवंडी) अशी जखमींची नावे आहेत.

अपघातग्रस्त वाहनांमध्ये दोन कार, रिक्षा व दुचाकी यांचा समावेश आहे. वॅगनार कारला मागून येणार्‍या युवान कारने जोरदार धडक दिली. याचवेळी एका दुचाकीला व रिक्षालाही धडक बसली. अपघातानंतर चारही वाहने रस्त्याच्या उजव्या बाजूला असलेल्या खड्डयात पडल्याने तिघेजण गंभीर जखमी झाले. पोलीस व ग्रामस्थांनी मदतकार्य करत जखमी कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.