खेडशीत घरी आलेल्या पाहुण्यानेच केली मंगळसूत्राची चोरी

रत्नागिरी:- घरी राहण्यास आलेल्या पाहुण्यानेच घरातील ४५ हजार रुपयांचे मंगळसूत्र लांबवले. याबाबत ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून ही घटना बुधवार २३ मार्च रोजी सकाळी ८.४५ वा. उघडकीस आली.

साहिल संजय मटकर (रा. मठ लांजा, रत्नागिरी ) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या विरोधात हरिश्चंद्र सखाराम वरेकर (रा. खेडशी, रत्नागिरी) यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. 

त्यानुसार, २२ मार्च रोजी साहिल मटकर हा वरेकर यांच्या घरी मुक्कामाला होता.दुसऱ्या दिवशी २३ मार्चला घरात कोणाचे लक्ष नाही असे पाहून त्याने मंगळसूत्र घेऊन पोबारा केला.याप्रकरणी अधिक तपास ग्रामीण पोलीस करत आहेत.