जिल्ह्यात नव्याने 1 पॉझिटिव्ह रुग्ण

रत्नागिरी:- शुक्रवारी आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात 355 तपासण्यांमध्ये केवळ 1 पॉझिटिव्ह रुग्ण सापडला आहे. नव्याने एकाही मृत्यूची नोंद करण्यात आलेली नाही. जिल्ह्यात सद्यस्थितीत केवळ 6 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. 

नव्याने एक रुग्ण कोरोनामुक्त झाला तर आतापर्यंत 81 हजार 925 रुग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. जिल्ह्यात कोरोनामुक्तीचे प्रमाण  96.99 टक्के आहे. नव्याने 1 पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने एकूण बाधित रुग्णसंख्या 84 हजार 466 झाली आहे. 

जिल्ह्यात कोरोनाने आतापर्यंत 2 हजार 534 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. जिल्ह्याचा मृत्युदर 3 टक्के आहे. जिल्ह्यात गृह विलगीकरणात 5 तर संस्थात्मक विलगीकरणात 1 रुग्ण उपचार घेत आहेत.