जिल्ह्यात बुस्टर डोस घेणाऱ्यांची संख्या केवळ 19 हजार 708

रत्नागिरी:- कोराना लसीकरणासाठी जिल्हा आरोग्य विभागाकडून सुरू असलेल्या कार्यवाहीनुसार आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनाच्या पहिल्या डोसचे 97.34 टक्के तर दुसऱ्या डोसचे 80.42 टक्के लसीकरण झालेले आहे. तर बुस्टर डोसची मात्र आतापर्यंत 19,708 जणांना देण्यात आली आहे.

कोरोनाचा प्रतिबंधासाठी आरोग्य विभागामार्पत कोरोना लसीकरणावर जास्तीत जास्त भर देण्यात आला आहे. त्यामध्ये आतापर्यंत जिल्ह्यात  18 वर्षांवरील 10 लाख 81 हजार 900 लाभार्थ्यांपैकी पहिल्या डोसचा लाभ 10 लाख 53 हजार 100 जणांना देण्यात आला आहे. तर दुसऱ्या डोसच्या लसीकरणाचा 8 लाख 70 हजार 166 लाभार्थ्यांना देण्यात आला आहे. आतापर्यंत 19 लाख 23 हजार 216 जणांचे पहिल्या व दुसऱ्या डोसचे लसीकरण 10 मार्चपर्यंत पूर्णत्वास गेलेले आहे.

जिल्ह्यात आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर आणि 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक यांना बुस्टर डोस दिला जात आहे. जिह्यात आतापर्यंत 6,736 आरोग्य कर्मचाऱ्यांनी, तर 5,815 पंटलाईन वर्कर यांनी बुस्टर डोस घेतला आहे. 60 वर्षांवरील 7157 जणांनीच बुस्टर डोस घेतला आहे. त्याचबरोबर 15 ते 17 वयोगटातील विद्यार्थ्यांचेही लसीकरणाचा लाभ देणे सुरू आहे. 9 फेब्रुवारीपर्यंत या वयोगटातील पहिला डोस 47,221 विद्यार्थ्यांना तर दुसरा डोस 5,934 विद्यार्थ्यांना डोसचा लाभ देण्यात आलेला होता. आता 10 मार्चपर्यंत या वयोगटातील पहिला डोस 49,149 विद्यार्थ्यांना तर दुसरा डोस 31,792 विद्यार्थ्यांना डोसचा लाभ देण्यात आलेला आहे.

जिल्ह्यात पहिल्या व दुसऱ्या डोसचे एकूण लाभार्थीः संगमेश्वर 2,19,192, खेड 2,20,046, लांजा 1,21827, चिपळूण 3,59,826, रत्नागिरी 4,37,710, मंडणगड 62,417, दापोली 1,90,806, राजापूर 1,73,396, गुहागर 1,36,996 इतके आहेत.