ब्रेकफेल झालेल्या मालवाहू ट्रकखाली सापडलेल्या दुचाकीचा चेंदामेंदा; सुदैवाने जिवितहानी टळली

रत्नागिरी:- शहरातील चर्मालयाजवळील किस्मत बेकरीसमोर गुरुवारी सकाळी 11.20 वा.लोडेड 14 चाकि ट्रक ब्रेक फेल झाल्याने उतारात मागे आल्याने झालेल्या अपघातात दोन वाहनांचे नुकसान झाले. सुदैवाने यात कोणीतीही जिवितहानी झालेली नसून कोणी जखमीही झालेले नाही.

गुरुवारी दुपारी गंगाराम शोभाराम (रा.मध्यप्रदेश) आपल्या ताब्यातील ट्रक (एमएच-18-बीए-5484) घेउन किस्मत बेकरीसमोर ट्रकमधील तांदाळची पोती उतरवत होता.त्यावेळी त्याने ट्रकचा हॅन्डब्रेक लावेला होता.परंतू उतारात ब्रेक फेल झाला.त्यावेळी ट्रकच्या पाठीमागे दुचाकि चालक गणेश शिवाजी चव्हाण (रा.राजापूर) हा आपल्या ताब्यातील दुचाकि (एमएच-04-जीवाय-6985) पेट्रोल संपल्यामुळे हाताने ढकलत आणत होता.तसेच त्याच्या पाठीमागून  स्वप्निल धनाजी नारगुडे (रा.खेडशी,रत्नागिरी) हा आपल्या ताब्यातील महिंद्रा सुप्रिमो टेम्पो (एमएच-08-एसी-1638) घेउन येत असताना ट्रक अचानकपणे उतारात पाठीमागे येत असताना त्याने या दोन्ही वाहनां धकड दिली.यात दुचाकि ट्रकच्या पाठीमागील चाकात आल्याने तिचा पूर्णपणे चक्काचूर झाला.अपघाताची नोंद शहर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.