जिल्ह्यात 24 तासात केवळ 2 पॉझिटिव्ह रुग्ण 

रत्नागिरी:-गुरुवारी आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात 458 तपासण्यांमध्ये केवळ 2 पॉझिटिव्ह रुग्ण सापडला आहे. नव्याने एकाही मृत्यूची नोंद करण्यात आलेली नाही. जिल्ह्यात सद्यस्थितीत केवळ 7 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. 

नव्याने 7 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून आतापर्यंत 81 हजार 915 रुग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. जिल्ह्यात कोरोनामुक्तीचे प्रमाण  96.99 टक्के आहे. नव्याने 2 पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने एकूण बाधित रुग्णसंख्या 84 हजार 456 झाली आहे. 

जिल्ह्यात कोरोनाने  आतापर्यंत 2 हजार 534 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. जिल्ह्याचा मृत्युदर 3 टक्के आहे. जिल्ह्यात गृह विलगीकरणात 3 तर संस्थात्मक विलगीकरणात 4 रुग्ण उपचार घेत आहेत.