रिपोर्ट घसरला; मासळीच्या दरात काही प्रमाणात वाढ

रत्नागिरी:- मासेमारीसाठी समुद्रात नौका जात असल्या तरी त्यांना रिकाम्या हाती परतावे लागत आहे. यामुळे माशांच्या दरही कडाडले आहेत. बांगडा 200 रुपये, सुरमई 400 ते 600 रुपये, पापलेट 800 ते 1200 रुपये, सरंगा 350 ते 500 रुपये, बोंबील 150 ते 180 रुपये, कोलंबी दर्जानुसार 120 ते 400 रुपये किलोने विक्री होत आहे.

गत आठवड्यात 30 ते 40 रुपयांनी विक्री होणारा कांदा गत आठवडा बाजारात 20 ते 25 रुपये किलोने उपलब्ध होत असल्याने महागाईच्या दिवसात सर्वसामान्यांना थोडाफार दिलासा मिळाला आहे. कांद्या बरोबरच टॉमेटोचे दरही काही प्रमाणात उतरले आहेत.

लांबलेला पाऊस, कोरोना कालावधीत वाहतुकीवर झालेला परिणाम यामुळे यंदाही कांद्याचे दर कडाडले होते.  या आठवड्यात मात्र भाज्यांचे दर थोड्याफार प्रमाणात कमी झाले आहेत. कांदा 20 ते 30 रुपये किलो, बटाटा 20 रुपये, गवार, फरसबी 60 रुपये, टोमॅटो 10 ते 20 रुपये, कोबी 20 रुपये, वांगी, फ्लॉवर, मटार 50 ते 80 रुपये, आलं 60 रुपये तर कोथिंबीरची एक जुडी 10 रुपयांना मिळत आहे. मिरचीचे दर मात्र चढेच आहेत. एक किलो हिरवी मिरची 120 ते 150 रुपये किलोने विकली जात आहे.
शहरानजिकच्या गावातून पालेभाज्या येत आहेत. सध्या यांचे प्रमाण चांगले असल्याने याचे दरमात्र परवडणारे आहेत. चवळी, लालमाठ, हिरवामाठ यांची जुडी 10 रुपये, मुळा 10 ते 15 रुपये, वाल 10 रुपये तर गावठी मेथी 10 रुपयाला 15 जुड्या मिळत आहेत.

भाज्यांचे दर उतरले असले तरी कडधान्य आणि डाळींच्या किमती जैसे थेच आहेत. खाद्यतेलाचे दर अद्याप उतरले नसून, रशिया-युक्रेन युद्धामुळे हे दर आणखी वाढण्याची शक्यता किराणा व्यापार्‍यांकडून व्यक्त करण्यात येत आहेत.

तूर डाळ, मूग डाळ, उडीद डाळ, चणा डाळ, मसूर डाळ तसेच ज्वारी यांच्या दरातही वाढ झाली आहे. चिकनचे दरही दोनशे पार पोहचले आहेत. एक किलो चिकन 230 रुपये तर जिवंत कोंबडी 130 ते 140 रुपये किलोने मिळत आहे. अंडेही 5 ते साडेपाच रुपयांना एक याप्रमाणे मिळत आहे.