जिल्ह्यात केवळ 11 ॲक्टिव्ह रुग्ण; नव्याने एक पॉझिटिव्ह 

रत्नागिरी:- रविवारी आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात 526 तपासण्यांमध्ये केवळ 1 पॉझिटिव्ह रुग्ण सापडला आहे. तर तब्बल 2 रुग्ण उपचारांती बरे झाले आहेत. नव्याने एकाही मृत्यूची नोंद करण्यात आलेली नाही. जिल्ह्यात सद्यस्थितीत केवळ 11 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. 

जिल्ह्यात 24 तासात 2 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत 81 हजार 903 रुग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. जिल्ह्यात कोरोनामुक्तीचे प्रमाण  96.98 टक्के आहे. नव्याने 1 पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने एकूण बाधित रुग्णसंख्या 84 हजार 451 झाली आहे. 

जिल्ह्यात कोरोनाने आतापर्यंत 2 हजार 534 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. जिल्ह्याचा मृत्युदर 3 टक्के आहे. जिल्ह्यात गृह विलगीकरणात 9 तर संस्थात्मक विलगीकरणात 2 रुग्ण उपचार घेत आहेत.