जिल्ह्यात 24 तासात अवघा एक पॉझिटिव्ह रुग्ण; ॲक्टिव्ह रुग्णसंख्या देखील 50 वर

रत्नागिरी:- रविवारी आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात 524 तपासण्यांमध्ये केवळ 1 पॉझिटिव्ह रुग्ण सापडला आहे. तर तब्बल 4 रुग्ण उपचारांती बरे झाले आहेत. नव्याने एकाही मृत्यूची नोंद करण्यात आलेली नाही.

जिल्ह्यात 24 तासात 4 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत 81 हजार 850 रुग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. जिल्ह्यात कोरोनामुक्तीचे प्रमाण  96.94 टक्के आहे. नव्याने 1 पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने एकूण बाधित रुग्णसंख्या 84 हजार 434 इतकी झाली आहे. 

जिल्ह्यात कोरोनाने आतापर्यंत 2 हजार 534 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. जिल्ह्याचा मृत्युदर 3 टक्के आहे. जिल्ह्यात गृह विलगीकरणात 24 तर संस्थात्मक विलगीकरणात 26 रुग्ण उपचार घेत आहेत.