रत्नागिरीच्या मुसा अब्दुल्ला नौकेला एक लाखांचा दंड; परवाना तीन महिन्यांसाठी रद्द

रत्नागिरी:- अनधिकृत मच्छिमारी करताना मत्स्यव्यवसाय विभागाने पकडलेल्या रत्नागिरी येथील मुसा अब्दुला या नौकेला १ लाख रूपये दंड व नौकेचा परवाना तीन महिन्याकरीता निलंबित करण्याची कारवाई मत्स्यव्यवसाय विभागाने केली आहे.

मत्स्यव्यवसाय विभागाच्या शीतल या गस्तीनौकेद्वारे परवाना अधिकारी रविद्र मालवणकर आणि सागरसुरक्षा रक्षक समुद्रात गस्त घालत असताना १३ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ वा.सुमारास विजयदूर्ग विजयदूर्ग बंदरासमोरील आठ वावांमध्ये रत्नागिरी येथील मुजाहीर अब्दूल रेहमान होडेकर यांच्या मालकीची मुसा अब्दुल्ला ही अनधिकृतपणे मच्छिमारी करताना पकडली होती.

या नौकेचा ट्रॉलींग मासेमारीचा परवाना असताना नौकेवर पर्ससीन जाळी आढळून आली. जाळ्यांची मेससाईज, लायसन्स अटी व शर्तींचा भंग, पर्ससीन मासेमारीस बंदी असताना या नौकेवर पर्ससीन जाळे, नौकांवर मासळी आढळली नाही.नौकेवरील २० खलाशांपैकी फक्त ६ खलाशांचा विमा उतरविलेला आढळून आला.यामुळे महाराष्ट सागरी मासेमारी नियमन अधिनियम १९८१ अंतर्गत कलम १५ नुसार कारवाई केली होती व प्रतिवेदन सादर करण्यात आले होते.यावर सुनावणी होवून महाराष्ट सागरी मासेमारी नियमन अधिनियम १९८१ व सुधारीत अध्यादेश कलम १७ चे ५(एक) अन्वये नियमाचा भंग केल्यामुळे नौकामालक मुजाहीर अब्दूल रेहमान होडेकर, रत्नागिरी यांना १ लाख रूपये दंड व नौकेचा परवाना ३ महिन्याकरीता निलंबित करण्याचा कारवाईचे आदेश सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय रqवद्र मालवणकर यांनी दिले.