रेल्वेत टीसीच्या बॅगची चोरी; महत्वाची कागदपत्र चोरीला 

रत्नागिरी:- रत्नागिरी ते पनवेल अशी टीसीची डयुटी करणार्‍या जितेंद्र रेळकर (54, पनवेल रायगड) यांची वास्को पटना एक्सप्रेसच्या ट्रेन मध्ये ठेवलेली बॅग चोरीस गेल्याची घटना घडली आहे. ते रत्नागिरी ते पनवेल अशी डयुटी करत होते.

याबाबतची फिर्याद जितेंद्र रेळेकर यांनी चिपळूण पोलीस स्थानकात दाखल केली. त्यांच्या बॅगेत घराच्या चाव्या, लॉकरच्या चाव्या, एअर फोर्स एस-सर्व्हिसमन ओळखपत्र, डेबीट कार्ड, डयुटी पास, टीसीचे तक्रार बुक, टीसी युनिफॉर्म चोरीस गेला. चिपळूण पोलीसांनी अज्ञाताविरोधात भादविकलम 379 नुसार गुन्हा दाखल केला आहे.