जिल्ह्यात 24 तासात अवघे 19 पॉझिटिव्ह तर एका मृत्यूची नोंद

रत्नागिरी:- मंगळवारी आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात जवळपास 911 तापसण्यांमध्ये केवळ 19 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. तर तब्बल 28 रुग्ण उपचारांती बरे झाले आहेत. नव्याने एका मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

जिल्ह्यात 24 तासात 28 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत 49 हजार 464 रुग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. जिल्ह्यात कोरोनामुक्तीचे प्रमाण  96.60 टक्के आहे. नव्याने 19 पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने एकूण बाधित रुग्णसंख्या 84 हजार 334 इतकी झाली आहे. 

जिल्ह्यात कोरोनाने आतापर्यंत 2 हजार 527 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. जिल्ह्याचा मृत्युदर 3 टक्के आहे. जिल्ह्यात गृह विलगीकरणात 101 तर संस्थात्मक विलगीकरणात 404 रुग्ण उपचार घेत आहेत.