कोतवडे ते सड्ये रस्ताबाबत दिनांक 26 जानेवारी रोजी होणारे आंदोलन तात्पुरते स्थगित 

रत्नागिरी:- रत्नागिरी तालूक्यातील कोतवडे ते सड्ये रस्ताबाबत दिनांक 26 जानेवारी रोजी होणारे आंदोलन तात्पुरते सावॅजनिक बांधकाम विभाग रत्नागिरी यांच्याकडून लेखी पञ मिळाल्या मुळे तात्पुरते स्थगित करण्यात आले असुन सदर कामाला दिनांक 27 पासुन सुरूवात होणार असुन पुन्हा ठेकेदाराने या कामात गपलत केल्यास आंदोलन छेडले जाईल असे मत उपस्थित ग्रामस्थांनी व्यक्त केले.

               या बाबत कोतवडे ग्रामस्थ यांनी दिनांक 17 जानेवारी रोजी सावॅजनिक बांधकाम विभाग रत्नागिरी यांना कोतवडे ते सड्ये रस्ताचे काम निकृष्ठ दजाॅचे असल्याचे व आम्ही ग्रामस्थ या कामाविरोधात दिनांक 26 जानेवारी रोजी आरे वारे तिठा याठिकाणी रस्ता रोखो आंदोलन करणार असल्याचे पञकार दिले होते. सदरच्या निवेदनाची दखल घेत सावॅजनिक बांधकाम विभागाच्या कायॅकारी अभीयंता विना पुजारी यांनी मंगळवार दिनांक 25 जानेवारी रोजी सायंकाळी कोतवडे ते सड्ये रस्ताच्या कामाची पाहणी केली. यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी ठेकेदाराने केलेल्या कामाची जणू पोलखोलच केली. कोणत्याही प्रकारचे डांबर न ठाकता फक्त काळी खडी ठाकून त्यावरून रोलर फीरवला जात होता. यावेळी प्रत्यक्ष रस्ताची पाहणी केल्या नंतर सदर रस्ताच्या कामाचा दजाॅ उत्कृष्ट ठेवून काम तात्काळ पूर्ण करण्यात येईल.  तसेच सपूणॅ काम पूर्ण होई पयॅत सावॅजनिक बांधकाम विभाग रत्नागिरी यांच्याकडून योग्य प्रकारे लक्ष ठेवण्यात येईल असे लेखी स्वरूपात पञ येथिल ग्रामस्थांना दिल्या नंतर ग्रामस्थांनी तात्पुरते आंदोलन मागे घेतले असून ठेकेदाराने पून्हा हलगजीॅपणा व निकृष्ठ दजाॅचे काम केल्यास पून्हा आंदोलन छेडले जाईल असे ग्रामस्थ यांनी सांगितले. 

           यावेळी जेष्ठ ग्रामस्थ अरूण पेडणेकर,  समीर कदम,  प्रशांत सनगरे , प्रकाश वारेकर,  चंद्रकांत भावे, महेश कांबळे , दयानंद पवार,  विश्वास कांबळे,  सुहास शितप , चंद्रकांत पालये ,किरण सुवॅ आदीसह दशक्रोशितील ग्रामस्थ हजर होते.