क्रेडीट कार्डची चोरी करत 1 लाख 40 हजारावर डल्ला

रत्नागिरी:- रत्नागिरी शिवाजीनगर येथील राकेश राहुल जाधव (35, रा. पारस टॉवर नरहर वसाहत, शिवाजीनगर, रत्नागिरी) यांच्या घरातून क्रेडिट कार्ड चोरीस गेले होते. या क्रेडिट कार्ड वरुन अज्ञाताने 1 लाख 40 हजार 100 रुपये परस्पर लंपास केले.

ही घटना 18 जानेवारी ते 19 जानेवारी दरम्यान घडली. आपल्या क्रेडिट कार्डवरून पैसे गेल्याचे लक्षात येताच जाधव यांनी येथील शहर पोलीस स्थानकात फिर्याद दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी भादवि कलम 420 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.