शासकीय कार्यालयांना महावितरणचा झटका; सर्कल, तलाठी कार्यालयाची वीज तोडली

कार्यालयात अंधार, २२ हजार ३७० ची थकबाकी

रत्नागिरी:- वीज बिल थकविणाऱ्या शासकीय कार्यालयांना महावितरण कंपनीने झटका दिला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात असलेल्या सर्कल आणि तलाठी कार्यालयाचे २२ हजार ३७० रुपये वीज बिल थकले आहे. याबाबत १५ दिवसाची आगावू नोटीस देऊन देखील बील न भरल्याने महावितरण कंपनीने विद्युत पुरवठा खंडित केला आहे. त्यामुळे अधिकाऱी, कर्मचाऱ्यांना अंधारात बसण्याची आणि मोबाईल टॉर्चचा (बॅटरी) वापर करून काम करण्याची वेळी आली.

महावितरण कंपनीने वीज बिल थकविणाऱ्या ग्राहकांविरोधात जारदार मोहिम आखली आहे. त्यानुसार नोटीस बजावूनही वीज बिल न भरणाऱ्यांवर कठोर कारवाई करत वीज जोडणी तोडली जात आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्कल आणि तलाठी कार्यालयाचेही वीज बील थकीत आहे. याबाबत महावितर कंपनीने त्यांना नोटीन देऊन १५ दिवस आगावू सूचना दिली होती. तरीही वीज बिल न भरल्यामुळे अखेर महावितरणने सर्कल व तलाठी कार्यालयाचा वीजपुरवठा खंडित केला आहे. त्यामुळे तेथील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली असून अनेकांची ऑनलाईन कामे खोळंबली आहेत.
 कार्यालयातील कर्मचारी मोबाईलवर व मेणबत्तीच्या उजेडात काम सुरू केले आहे. १७ डिसेंबर २०२१ ची थकबाकी २२ हजार ३७० रुपये  आहे. ती न भरल्याने महावितरण कंपनीने ही कारवाई केली आहे. आपला विद्युत पुरवठा  कायदा २००३ चे कलम ५६ अन्वये कोणतीही सूचना न देता महावितरण कंपनीने विद्युत पुरवठा खंडित केला जाईल, असे सर्कल आणि तलाठी कार्यालयावर लावलेल्या नोटीसीमध्ये स्पष्ट केले होते.