निवळी येथे निराधारांसाठी काम करणाऱ्या संस्थेत दोन दिवसांत 23 जण कोरोनाबाधित

रत्नागिरी:- ओमिक्रोनचा धोका हळूहळू वाढत असताना तालुक्यातील निवळी येथील एका संस्थेत कोरोनाचा विस्फोट झाला आहे. निराधारांसाठी काम करणाऱ्या संस्थेतील तब्बल 23 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

दोन दिवसात इतक्या मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडल्याने संस्थेतील सर्वांची कोरोना चाचणी करण्यात आली असून आरोग्य विभागाने आवश्यक त्या सर्व उपाययोजना हाती घेतल्या आहेत.