नव्या सत्ताधाऱ्यांच्या कालावधीत अनधिकृत बांधकामांना ऊत; लोकप्रतिनिधींवर कारवाईची मागणी

रत्नागिरी:- पूर्णगड खाडी किनारी भागात अनधिकृत बांधकाम जोरदार पध्दतीने सुरू आहे. 922 नियमांचे उल्लघंन करत विना परवाना बांधकाम करण्याचा नवा पायंडा नव्या सत्ताधिकार्‍यांच्या कालखंडात सुरू झाल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे.

ग्रामपंचायतमध्ये सत्ताबद्दल झाल्यानंतर अनधिकृत बांधकाम पेव फुटल्याची चर्चा आहे. मात्र बांधकाम करतांना किनार्‍या लगतच्या अनेक नारळांच्या आणि अन्य झाडांची कत्तल करण्यात आली आहे. याकडे संबंधीत विभागाच्या अधिकार्‍यांनी दुर्लक्ष केला आहे.
पूर्णगड गावांतील काही ग्रामस्थानी, ग्रामपंचायत थकबाकी कायदेशिर देयक रक्कम दिलेल्या विहीत मुदतीत भरणा करण्यात कसूर केल्यामुळे त्याच्या विरोधात लोकशाही ‘अदालतीमध्ये’ भाविक पाठविणेसाठी रत्नागिरी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालय रत्नागिरी यांचेकडे याचीका दाखल करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने गावातील ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, त्यांच्यावर कारवाई करण्याची ग्रामपंचायकडे तरतूद आहे. तर ग्रामपंचायतच्या पदाधिकार्‍यांनी देखील मुंबई ग्रामपंचायत कायदयाचा कलम 53 अन्वये आवश्यक कारवाई करून गावात सुरू असलेल्या अनधिकृत बांधकाम काढून टाकण्याची कारवाई करण्यास कसूर केला आहे. तेव्हा संबंधित अधिकारी मुंबई ग्रामपंचायतच्या कायदयाच्या तरतूदीनुसार ग्रामपंचायतच्या पदाधिकारी विरूध्द आवश्यक कारवाई त्वरती करावी. विशेषत: मुंबई ग्रामपंचायत कायद्याचे कलम 39 अन्वये त्यांच्या विरूध्द कारवाई करावी या बाबत गावांतील रहीवासी ब्रखेज दर्वेश यांनी जिल्हाधिकारीकडे तक्रार केली आहे.