…अन्यथा नाईलाजास्तव लॉकडाऊनचा पर्याय: ना. सामंत 

रत्नागिरी:- कोरोना पॉझिटिव्हिटी रेट १ टक्क्यावरून ५.१३ टक्के एवढा वाढला आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्य शासनाच्या निर्बंधांचे तंतोतंत पालन करावे लागणार आहे. तिसऱ्या लाटेच्या शक्यतेने जिल्हा प्रशासन, आरोग्य यंत्रणा सज्ज आहे. जर लॉकडाऊन
करण्याचा निर्णय घ्यावा लागला, तर व्यापाऱ्यांसह सर्वांना विश्वासात घेऊन घेतला जाईल. आठवडा बाजारात मास्क लावला जात नाही. त्याचे
निरीक्षण करून ते बंद करण्याबाबत नाईलाजास्तव प्रशासनाला निर्णय घ्यावा लागेल. मात्र ती वेळ येऊ नये यासाठी कोरोनाचे नियम काटेकोर पाळा, असे आवाहन उच्च व तंत्रशिक्षमंत्री उदय सामंत यांनी केले.

जिल्ह्यात संसर्ग रोखण्यासाठी जमावबंदी लागू केली आहे. पोलिसांनी जमावबंदी आणि विनामास्क फिरणाऱ्यावर कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच मास्कचा दंड ५०० एवजी सरसकट ३०० रुपये करण्यास सांगितल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जिल्हा प्रशासन, आरोग्य, पोलिस विभागाच्या झालेल्या बैठकीनंतर आयोजित ऑनलाईन पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
ते म्हणाले, जिल्ह्यात ७१ हजार ६३३ मुला, मुलींचे लसीकरण करण्यात येणार आहे. तर आतापर्यंत १ हजार ७७४ मुलांचे लसीकरण झाले आहे. पॉझिटिव्हिटी रेट वाढल्याने आता त्यानियमांचे तंतोतंत पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तिसऱ्या लाटेच्याअनुषंगाने जिल्हा प्रशासनाची पुर्ण तयारी झाली आहे. जिल्ह्याला ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही.  बेड १ हजार ०३६ आहेत, तिसऱ्या लाटेसाठी १ हजार ५२६ बेड आवश्यक आहेत. व्हिसीएच व्हेंटिलेटर १२२ ची गरज आहे, मात्र आपल्याकड १२५ उपलब्ध आहेत. लहान मुलांसाठी ६ आवश्यक आहेत. आपल्याकडे १७ आहेत. बिसीएचमध्ये २४४ ऑक्सिजनची आवश्यक असून आपल्याकडे ५०० आहेत. आरोग्य विभागाची तिसऱ्या लाटेच्यादृष्टीने पुर्ण तयारी झाली आहे. भविष्यात लॉकडाऊन करायचे म्हटले तर व्यापारी, विविध संस्थांशी, नागरिक अशा सर्व घटकांना विश्वासत घेऊन निर्बंध घातले जातील. आठवडा बाजारात देखील मास्क वापरत नाहीत, अशा तक्रारी आहेत. म्हणून आठ दिवसापर्यंत सर्व आठवडा बरांचे निरीक्षण करून नियमांचे पालन होणार नसले तर भविष्यातील आठवडा बाजार नाईलाजाने बंद करण्याचा निर्णय प्रशासनान घ्यावा लागेल.

जिल्ह्यात १० तारखेपासून बुष्टर डोस सुरू केला जाणार आहेत. सध्या १ लाख ७० हजार लस उपलब्ध आहे. अजून २०  हजार लसीचा पुरवठा होणार आहे. म्हणजे २ लाख लस आपल्याकडे उपलब्ध असले. १५ ते १८ वयोगटातील मुलांनाही आणि ६० वर्षावरील व्यक्ती, पहिल्या फळीतील अधिकारी, कर्मचारी यांना डोस दिले जाणार आहे, असे सामंत म्हणाले.  

महाविद्यालयांबाबत आज ४ वाजता निर्ण

आज दुपारी जिल्हाधिकारी, आरोग्य अधिकारी, कुलगुरू आदींची बैठक होणार आहे. त्यामध्ये महाविद्यालये बंदबाबत तर वसतिगृह, ग्रंथालय, कर्मचारी उपस्थिती आदीबाबत चर्चा करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानंतर दुपारी चार वाजता निर्णय घेतला जाईल, असे मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.