जिल्ह्यात नव्याने 9 पॉझिटिव्ह रुग्ण

रत्नागिरी:- नव्याने आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात 24 तासात 247 अहवालांमध्ये 9 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. 24 तासात एकाही रुग्णाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला नसला तरी जिल्ह्यात सद्यस्थितीत 106 पॉझिटिव्ह रुग्ण उपचारखाली आहेत. 

जिल्ह्यात 24 तासात 2 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत 76 हजार 659 रुग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. जिल्ह्यात कोरोनामुक्तीचे प्रमाण  96.72 टक्के आहे. नव्याने 9 पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने एकूण बाधित रुग्णसंख्या 79 हजार 256 इतकी झाली आहे. 

 जिल्ह्यात आतापर्यंत 2 हजार 491 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. जिल्ह्याचा मृत्युदर 3.1 टक्के आहे. जिल्ह्यात गृह विलगीकरणात 75 तर संस्थात्मक विलगीकरणात 31 रुग्ण उपचार घेत आहेत.