रत्नागिरीतील प्रसिध्द उद्योजक, शिर्के पेट्रोल पंपाचे मालक शिवाजीराव शिर्के यांचे दुःखद निधन

रत्नागिरी:- रत्नागिरीतील प्रसिध्द उद्योजक व शिर्के पेट्रोल पंपाचे मालक शिवाजीराव शिर्के यांचे आज पहाटे चार वाजता वृध्दापकाळाने दुःखद निधन झाले.

शिवाजीराव शिर्के यांनी आपल्या मनमिळाऊ स्वभावामुळे अनेक मित्र जोडले होते. त्यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त होत आहे. त्याची अंत्ययात्रा एमआयडीसी येथील राहत्या घरातून निघणार आहे. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुलगे, दोन विवाहित कन्या, नातवंडे असा परिवार आहे.