जिल्ह्यात 24 तासात केवळ 1 पॉझिटिव्ह रुग्ण 

रत्नागिरी:- नव्याने आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात 894 अहवालांमध्ये 1 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. 24 तासात एकाही रुग्णाचा उपचारा दरम्यान मृत्यू झालेला नाही. जिल्ह्यात सद्यस्थितीत 31 रुग्ण उपचारखाली आहेत. 

जिल्ह्यात 24 तासात 5 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत 76 हजार 629 रुग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. जिल्ह्यात कोरोनामुक्तीचे प्रमाण वाढून  96.81 टक्के आहे. नव्याने 1 पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने एकूण बाधित रुग्णसंख्या 79 हजार 150 इतकी झाली आहे. 

 जिल्ह्यात आतापर्यंत 2 हजार 490 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. जिल्ह्याचा मृत्युदर 3.15 टक्के आहे. जिल्ह्यात गृह विलगीकरणात 10 तर संस्थात्मक विलगीकरणात 21 रुग्ण उपचार घेत आहेत.