बारमध्ये राडा; उद्यमनगरमधील दोघांना बिअरच्या बाटलीने भोसकले

रत्नागिरी:- शहरातील मारुती मंदिर परिसरात असलेल्या एका देशी दारू, बिअरबारमध्ये शिविगाळ करण्यावरून एकाने रागाच्या भरात उद्यमनगरमधील दोघांपैकी एकाला बिअरची बाॅटल फोडून भोसकले. तर दुसऱ्यावरही वार केल्यानंतर हल्ला करणारा पोलीस स्थानकात तर हल्ला झालेले दोघे घटनास्थळावरून गायब झाले. रात्री उशिरापर्यंत दोन्ही जखमींचा शोध शहर पोलीस घेत होते.परंतु रात्री उशिरापर्यंत दोघेही पोलिसांना सापडले नव्हते. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. दारुच्या नेशेत तिघांमध्ये हा राडा झाला.तर हल्ला करणारा रक्ताने माखलेल्या कपड्यांमध्ये शहर पोलीस स्थाकात दाखल झाला होता.

मारुती मंदिर येथील देशी दारू, बिअरबारमध्ये दोन वेगवेगळ्या टेबल वर तिघेजण मद्यप्राशन करत बसले होते. यावेळी तिघांची शिवी दिल्यावरून तिघांमध्ये बाचाबाची सुरू झाली. यानंतर एका टेबलवर बसलेल्या दोघांनी दुसर्‍या टेबलावरील एकाला बारमध्येच बेदम मारहाण केली. यानंतर मारहाण झालेल्या तरुणाने बारमधील बिअरची बाॅटल फोडून दोघांपैकी एकाला भोसकले तर एकाच्या हातावर वार केला आहे.

या घटनेनंतर बारसह मारुती मंदिर परिसरात खळबळ उडाली. बारमधील अन्य ग्राहक तात्काळ तेथून बाहेर पडले. तर हाणामारी झाल्यानंतर बियरच्या बाॅटलने वार करणारा तरुण शहर पोलीस स्थानकात रक्ताने माखलेल्या कपड्याने दाखल झाला होता.
त्याच्या अंगावरील कपडे रक्ताने माखलेले असल्याने समोरचा तरुणाला त्याने मोठ्या प्रमाणात भोसकले असली शक्यता आहे, तर या दोघांना मारहाण करण्यात आली ते दोघेही बारमधून गायब झाल्याने पोलिसांनी दोघांचाही शोध रात्री उशिरापर्यंत सुरु ठेवला होता.मात्र जखमी असलेले दोन्ही तरुण पोलिसांच्या हाती लागले नव्हते. त्यामुळे जखमी दोघे नेमके गेले कुठे ? त्याचा शोध पोलीस घेत आहेत. जखमी न सापडल्याने रात्री उशिरापर्यंत पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला नव्हता.