जिल्ह्यात 418 अहवालांमध्ये नव्याने 8 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

रत्नागिरी:- नव्याने आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात 418 अहवालांपैकी 8 जण कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. तर मागील 24 तासात जिल्ह्यात कोरोनाने एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. जिल्ह्यात सद्यस्थितीत 53 रुग्ण उपचाराखाली आहेत. 

जिल्ह्यात 24 तासात 2 रुग्ण उपचाराअंती कोरोनामुक्त झाले असून आतापर्यंत 76 हजार 555 रुग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. जिल्ह्यात कोरोनामुक्तीचे प्रमाण वाढून  96.79 टक्के आहे. नव्याने 8 पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने एकूण बाधित रुग्णसंख्या 79 हजार 93 इतकी झाली आहे. 

 जिल्ह्यात आतापर्यंत 2 हजार 485 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. जिल्ह्याचा मृत्युदर 3.14 टक्के आहे. जिल्ह्यात गृह विलगीकरणात 23 तर संस्थात्मक विलगीकरणात 30 रुग्ण उपचार घेत आहेत.