पाचवी- आठवी शिष्यवृत्तीचा निकाल जाहीर 

रत्नागिरी:- कोरोनाचा प्रार्दुभावामुळे महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषदेच्यावतीने घेण्यात आलेल्या इयत्ता 5 वी ची पूर्व उच्च पाथमिक शिष्यवृत्ती आणि 8 वी ची पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परिक्षेचा ऑनलाईन अंतरिम निकाल बुधवार 24 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने जाहीर करण्यात आला आहे.      

या परिक्षांच्या पूर्वनियोजित तारखा सुरूवातीला बदलल्या गेल्या होत्या. कोरोना नियमांचे पालन करीत या परिक्षा घेणे अडचणींचे असल्याचे शिक्षण तज्ञांनी मत व्यक्त केलेले होते. त्यामुळे या वर्गांच्या शिष्यवृत्ती परिक्षा होणार की नाही यावर अनिश्चितेचे ढग पसरलेले होते. गेल्या दिड वर्षांपासून विद्यार्थ्यांनी या परिक्षेसाठी अभ्यासही केला आहे. पण परिक्षा झाल्या नसल्याने पालक, विद्यार्थी संभ्रमात होते.  पण गेल्या 12 आŸगस्ट रोजी ही परिक्षा जिल्ह्यातील 139 परिक्षांकेंद्रावर पार पडली. या परिक्षेसाठी इ. 5 वी चे 7775 तर इ. 8 वी चे 3,657 विद्यार्थी परिक्षेसाठी पविष्ट झालेले होते.  परिक्षेचा निकाल 24 नोव्हेंबर रोजी दुपारी राज्य परिक्षा परिषदेतर्फे ऑनलाईन जाहीर करण्यात आला आहे. त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यात इ. 5 वीच्या शिष्यवृत्ती परिक्षेला बसलेल्या  चिपळूण तालुक्यातील 881 पैकी 208 विद्यार्थी उत्तीर्ण, दापोलीतील 772 पैकी 137, गुहागरमधील 608 पैकी 67, खेडमधील 880 पैकी 398, लांजातील 596 पैकी 90, मंडणगड 300 पैकी 37, राजापूर 808 पैकी 156, रत्नागिरी 1402 पैकी 300, संगमेश्वर 942 पैकी 127 विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत. तर इ. 8 वी मधील परिक्षार्थीमध्ये  चिपळूण तालुक्यातील 569 पैकी 101 विद्यार्थी उत्तीर्ण, दापोलीतील 294 पैकी 53, गुहागरमधील 321 पैकी 22, खेडमधील 449 पैकी 90, लांजातील 271 पैकी 35, मंडणगड 119 पैकी 8, राजापूर 350 पैकी 29, रत्नागिरी 637 पैकी 125, संगमेश्वर 360 पैकी 55 विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत. जिल्ह्यातील इ.5 वी शिष्यवृत्तीचे 1320 तर व इ. 8 वीच्या शिष्यवृत्तीचे 518 विद्यार्थी उद्रााrर्ण झालेले आहेत.