समूहातून भरकटलेला ‘फ्लेमिंगो’ आढळला गावखडी समुद्रकिनारी

रत्नागिरी:- तालुक्यातील गावखडी समुद्रकिनारी फ्लेमिंगो पक्षी आढळून आला आहे. समूहापासून भरकटल्याने हा पक्षी गावखडी समुद्रकिनारी आल्याची माहिती पक्षी मित्रांकडून प्राप्त झाली. गावखडी येथे आढळलेल्या फ्लेमिंगोचे छायाचित्र स्वस्तिक गावडे या तरुणाने टिपले आहे. साधारणपणे चार वर्षांपूर्वी जाकादेवी येथे आढळून आला होता.

फ्लेमिंगो एक पाणपक्षी असून त्यांना रोहित देखील म्हटले जाते. रोहित हे मोठे पक्षी आहेत जे त्यांच्या लांब गळ्यासाठी, काठीसारखे पाय आणि गुलाबी किंवा लालसर पंख या खास गोष्टीसाठी ओळखले जातात . इंटिग्रेटेड टॅक्सोनॉमिक इन्फॉर्मेशन सिस्टमच्या मते रोहित पक्ष्याच्या सहा प्रजाती आहेत आणि त्या म्हणजे लेसर फ्लेमिंगो , चिलीयन फ्लेमिंगो , ग्रेटर फ्लेमिंगो , अँडियन फ्लेमिंगो , जेम्स ( किंवा पुना ) फ्लेमिंगो आणि अमेरिकन ( किंवा कॅरिबियन ) फ्लेमिंगो . रोहित पक्षी हे भारतामध्ये उजनी जलाशय ( पुणे ) किंवा जायकवाडी ( औरंगाबाद ) मध्ये मोठ्या प्रमाणात आढळतात.

हे पक्षी दिसायला उंच , फिकट गुलाबी , पांढरा किवा लालसर पंख , लांब आणि काठीसारखे दिसणारे कठीण आणि मजबूत , साधारण गुलाबी शेड असणारे पाय , गुलाबी आणि काळ्या रंगाची चोच आणि लांब मान या सगळ्या शारीरिक वैशिष्ट्यांमुळे हा पक्षी खूप सुंदर आणि आकर्षक दिसतो .

रोहित पक्षी हे पाणपक्षी असल्यामुळे हे पाणी असलेल्या ठिकाणीच राहतात . हे पक्षी शक्यतो सरोवर किवा तलावाच्या आसपास राहतात . बहुतेक हे पक्षी एका ठिकाणी आपले वास्तव्य करत नाहीत कारण त्यांच्या प्रजनन क्षेत्रात हवामान किंवा पाण्याच्या पातळीत होणाऱ्या बदलामुळे हे पक्षी वेगवेगळ्या ठिकाणी स्तलांतर करतात.

रोहित पक्षी हे सर्वभक्षक म्हणजेच मांसाहारी पक्षी आहे आणि हा पक्षी गिधाडाहून मोठे असले तरी ते लार्वा , सूक्ष्म जीव , लहान कीटक आणि अळ्या , निळे – हिरवे आणि लाल एकपेशीय वनस्पती , मोलस्क , क्रस्टेशियन्स आणि लहान मासे खातात.

गावखडी येथे आढळलेल्या फ्लेमिंगोचे छायाचित्र स्वस्तिक गावडे या तरुणाने टिपले आहे. तर फ्लेमिंगो अर्थात रोहित पक्षी 4 वर्षांपूर्वी जाकादेवी येथे आढळल्याचे पक्षी अभ्यासक सुधीर रिसबुड यांनी सांगितले.