झरेवाडीतील पाटील बुवाची विनयभंगाच्या आरोपातून सुटका मात्र जादूटोणा विरोधी कायद्याचा खटला सुरूच

रत्नागिरी:- तालुक्यातील झरेवाडी येथील बहुचर्चित श्रीकृष्ण अनंत पाटील उर्फ पाटीलबुवा व त्याचा साथिदार जयंत रावराणे यांची विनयभंगाच्या आरोपातून न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी या खटल्याचा निकाल दिला. मात्र जादुटोणा विरोधी कायद्यातून पाटीलबुवा याच्यावर दाखल गुन्ह्याचा खटला अद्याप न्यायालयात सुरू आहे.

 मात्र जादुटोणा विरोधी कायद्यातून पाटीलबुवा याच्यावर दाखल गुन्ह्याचा खटला अद्याप न्यायालयात सुरू आहे . पाटीलबुवा हा झरेवाडी येथील मठामध्ये मी देवाचा अवतार आहे . असे सांगून येणाऱ्या महिलांना अश्लिल भाषेत शिवीगाळ करत होता . या घटनेचा व्हिडीओ ” समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर पाटीलबुवा याच्याविरुद्ध रत्नागिरी ग्रामीण पोलिसांत जादुटोणा विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता . तसेच तालुक्यातील एका गावातील महिलेने विनयभंगाचा गुन्हा पाटीलबुवा व त्याचा साथिदार जयत रावराणे याच्याविरुद्ध दाखल केला होता .  पिडीत महिलेने दाखल केलेल्या तक्रारीनुसार मुलाला आकडीचा आजार असल्याने पिडीत महिला ही ८ सप्टेंबर २०१६ रोजी पाटीलबुवा याच्या झरेवाडी येथील मठात गेली होती . यावेळी पाटीलबुवा याने महिलेला पाहताच अश्लिल शिवीगाळ करण्यास सुरवात केली . ही शिवीगाळ ऐकून पिडीत महिलेले याविरुद्ध पोलिसांत तक्रार करणार असल्याचे सांगितले . यावेळी पाटीलबुवा यांचा सहकारीशिवीगाळ करण्यास सुरूवात केली . ही शिवीगाळ ऐकून पिडीत महिलेले याविरुद्ध पोलिसांत तक्रार करणार असल्याचे सांगितले . यावेळी पाटीलबुवा यांचा सहकारी जयत रावराणे याने पिडीतेला शिवीगाळ करत धमकी दिली .  पाटीलबुवा हा यापूर्वी पोलिसांत नोकरीला असल्याचे या महिलेला समजताच तिने याविरूद्ध कोणतीही तक्रार दाखल केली नव्हती . मात्र पाटीलबुवा याचे आक्षेपार्ह व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल होताच पोलिसांनी बुवा विरुद्ध कारवाईचे पाऊल उचलले . यानंतर या महिलेने पाटीलबुवा याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली होती . त्यानुसार ग्रामीण पोलिसांनी पाटीलबुवा याच्याविरुद्ध भादवि कलम ३५४( अ ) ५०९ , ५०६ नुसार गुन्हा दाखल केला . तसेच न्यायालयापुढे दोषारोपपत्र दाखल केले होते . यावर अंतिम सुनावणी होऊन न्यायालयाने. पाटीलबुवा व त्याचा साथिदार रावराणे यांची  निर्दोष मुक्तता केली . पाटीलबुवाच्या वतीने ॲड निनाद शिंदे , अ‍ॅड. राहूल चाचे व तन्वी गद्रे यांनी काम पाहिले .