जिल्ह्यात नव्याने केवळ 7 कोरोना पॉझिटिव्ह; एका मृत्यूची नोंद

रत्नागिरी:-नव्याने आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात 679 अहवालांपैकी 7 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. तर मागील 24 तासात जिल्ह्यात कोरोनाने एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात 24 तासात 28 रुग्ण उपचाराअंती कोरोनामुक्त झाले असून आतापर्यंत 76 हजार 434 रुग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. जिल्ह्यात कोरोनामुक्तीचे प्रमाण वाढून  96.76 टक्के आहे. नव्याने 7 पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने एकूण बाधित रुग्णसंख्या 78 हजार 991 इतकी झाली आहे. 

 जिल्ह्यात आतापर्यंत 2 हजार 483 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. जिल्ह्याचा मृत्युदर 3.14 टक्के आहे. जिल्ह्यात गृह विलीगिकरणात 40 तर संस्थात्मक विलीगिकरणात 32 रुग्ण उपचार घेत आहेत.