अवघ्या दोन तासात निघाला साडेआठ कोटींचा अध्यादेश

रस्ते विकास, शहर सुशोभिकरणासाठीची ना. सामंतांची मागणी तातडीने पूर्

रत्नागिरी:- रत्नागिरीतील रस्ते विकास आणि जे जे आर्ट ऑफ स्कुलकडुन होणार्‍या शहराच्या सुशोभिकरणासाठी उच्च व तंत्रशिक्षमंत्री उदय सामंत यांनी केलेल्या मागणीनुसार तत्काळ साडे आठ कोटी रुपये दिले जातील, अशी घोषणा नगरविकास राज्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. जनतेचा हा पैसा असून त्याचा योग्य विनियोग झाला पाहिजे. विकास कामांना दर्जा पाहिजे. त्यासाठी जिल्हाधिकार्‍यांनी त्यावर लक्ष देऊन ती दर्जेदार कामे करून घ्यावी, अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या. सामंत यांच्या मागणीवरून अवघ्या दोन तासात नगरविकास खात्याने साडे आठ कोटीचा अध्यादेश काढला हे विशेष.

पालिकेच्या प्रशासकीय इमारतीच्या भुमिपूजनाप्रसंगी ते बोलत होते. रत्नागिरी पालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या भुमिपूजन सोहळ्या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी उच्च व तंत्रशिक्षमंत्री उदय सामंत, राजापूरचे आमदार राजन साळवी, जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील, जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग, नगराध्यक्ष प्रदीप उफ बंड्या साळवी, मुख्याधिकारी तुषार बांबर, उपनगराध्यक्ष रोशन फाळके, शिवसेना जिल्हा प्रमुख विलास चाळके, सचिन कदम, जिल्हा सहसंपर्क प्रमुख राजेंद्र महाडीक, शहर प्रमुख बिपिन बंदरकर यांच्या नगरसेवक, कर्मचारी आणि शिवसेना कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. ते म्हणाले, मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अनेक वर्षे सुरू आहे. केंद्र शासनाचा हा मार्ग आहे. मात्र राज्य शासनाच्या नावे खापर फोडले जात आहे. आम्ही यामध्ये बदनाम होत आहे. परंतु जेव्हा गणेशेत्सव येतो तेव्हा टोळ माफिच्यादृष्टीने आमच्याकडे बोट दाखविले जाते. मात्र गणेशभक्तांसाठी आम्ही तो निर्णय घेऊन टोल फाक फरतो. या राष्ट्रीय महामार्गा प्रमाणे आता आणखी दोन मार्ग होणार आहेत. त्यामध्ये कोस्टल हायवेचा समावेश आहे. त्याचे रुंदीकरण करून समुद्र समुद्र किनार्‍यावरून हा मार्ग येणार असल्याने तो अनेक खाड्या, जेटींनी तो जोडला जाणार आहे. पर्यटकांसाठी ही एक पर्वनी असणार आहे. एवढे नव्हे, तर दुसरा ग्रीनफिल्ड मार्ग देखील होणार आहे. मुंबई-गोवा महामार्गाप्रमाणे हा पर्यायी मार्ग असले. पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी या मार्गाची निर्मिती केली जात आहे. त्याला आतापर्यंत गदी मिळाली नव्हती. मात्र आता मिळाली आहे. या मार्गाचा डीपीआर तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. लवकरच त्याची पुढची प्रक्रिया सुरू होईल. त्यामुळे रत्नागिरीकर अवघ्या साडे तीन तासांमध्ये मुंबईला जाऊ शकणार आहेत. समृद्ध महामार्गाबाबत अनेकांनी वाद घातला, विरोध झाला. मात्र या मार्गाने त्या भागाचा प्रचंड विकास साधला आहे. ज्या गावांची कुठेच ओळख नव्हती. त्या गावांमध्ये आयाता आयटीपार्क होऊ लागले आहेत. त्यामुळे मुंबई-गोवा हा ग्रीनफिल्ड मार्ग देखील कोकणाला समृद्धी देणारा ठरणार आहे.
राज्यात अजूनही कोरोनाचा संसर्ग आहे. लवकरात लवकर या महामारीचे उच्चटन व्हावे, असा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी शासकीय नियम पाळा. या काळामध्ये राज्याचे अर्थ चक्रथांबले होते. त्यालाही गती देण्याच्यादृष्टीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चांगले प्रयत्न केले आहेत. मात्र शासनाने कोणत्याही विकास कामांना कात्री लावलेली नाही. विकास कामांना जास्तीत जास्त निधी देण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी पालिका, नगरपंचायती यांनी आल्या शहरातील कामांचे प्रस्ताव दिल्यास त्याला तत्काल निधी दिला जाईल.

श्री. शिंदे म्हणाले, पालिकेच्या नवीन प्रशाकीय इमारतीच्या कामाचे भुमिपूजन झाल्याचे मी जाहीर करतो. मी आराखडा पाहिला अतिशय सुंदर आहे. शहराचा कारभार हाकताना काही निर्णय किंवा ठराव घ्यावे लागतात. प्रशासकीय इमारत ही विकासाचे केंद्र असते. त्यामुळे चांगले काम व्हावे, यासाठी प्रयत्न करा. वैशिष्टपुर्ण निधीतून साडे सोळा कोटी रुपये मंजूर केले आहेत. राजापूरचे आमदार राजन साळवी यांनी राजापूर शहरासाठीच्या जलशुद्धकरण केंद्र व रस्त्यांसाठीचा निधी तिन कोटीचा निधी मंजूर करण्यात येईल असे आश्‍वासन दिले आहे.