रत्नागिरी शहरासाठी 7 कोटी 93 लाखांच्या घनकचरा प्रकल्पाला मंजुरी

रत्नागिरी:- रत्नागिरी नगर परिषदेच्या या प्रकल्पाला स्वच्छ भारत अभियान (नागरी) अंतर्गंत प्रकल्प अहवालास सुधारित पशासकीय मान्यता देताना नगरविकास विभागाने नवीन डीएसआरनार सुमारे 7 कोटी 93 लाखाच्या निधी मान्यता 27 ऑक्टोबरच्या निर्णयानुसार दिली आहे.     

रत्नागिरी नगर नगर परिषदेच्या दांडेआडोम येथील सुधारित घनकचरा प्रकल्पाच्या आराखड्यानुसार शासनाकडे सादर झालेल्या पस्तावानुसार स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) अंतर्गंत रत्नागिरी न.प.च्या 4 कोटी 51 लाख 66,133 इतक्या निधीच्या नागरी घनकचरा व्यवस्थापन पकल्पास पशासकीय मंजूरी देण्यात आली होती. पण या पकल्पाची अंमलबजावणी करण्याकरता न.प.कडे जागा उपलब्धता नव्हती. पण सर्वोच्च न्यायालयाने 6 मे 2020 रोजी दिलेल्या निर्णयानुसार जागेची उपलब्धता न.प.कडे झाली आहे. परंतु दरम्यानच्या काळात डीएसआर दरात वाढ झाल्याने जुन्या दराने काम करणे शक्य नव्हते. त्यामुळे पकल्पास सुधारित डीएसआर नुसार मान्यता देण्याची विनंती मुख्याधिकारी, नगर परिषद यांनी शासनाकडे केली होती. त्यानुसार रत्नागिरी न.प.च्या नवीन डीएसआरनुसार 7 कोटी 93 लाख 13,872 इतक्या निधीच्या घनकचरा व्यवस्थापन सुधारित सविस्तर पकल्प अहवालास उच्चाधिकारी समितीच्या मान्यतेच्या अधिन राहून शासन मान्यता देण्यात आली आहे. या कामाकरता येणारा अतिरिक्त खर्च न.प.ने 14 व्या वित्त आयोगाच्या शिल्लक निधीतून करावा असे म्हटले आहे.