विनायक बंदरकर ठरले रत्नागिरी व्यापारी महासंघाच्या बक्षीस योजनेचे पहिले मानकरी

रत्नागिरी:- रत्नागिरी शहर व्यापारी महासंघाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या दसरा- दिवाळी- नाताळ भव्य बक्षीस योजनेतील पहिल्या आठवड्यातील सोडत रविवारी काढण्यात आली. या सोडतीत विनायक बंदरकर हे भाग्यवान दुचाकीचे विजेते ठरले तर सुकेशा नांद्रे आणि श्रुतिका कांबळे हे दोघे एलईडी टीव्ही चे विजेते ठरले.

रत्नागिरी व्यापारी महासंघाकडून खास दसरा-दिवाळी-नाताळ अशी भव्य बक्षीस सोडत काढण्यात आली आहे. या कालावधीत स्थानिक बाजारपेठेतच खरेदी करणाऱ्या ग्राहकांना चारचाकी पर्यंतची बक्षिसे दिली जाणार आहेत. प्रत्येक आठवड्यात सोडत काढण्यात येणार असून स्थानिक बाजारपेठेत खरेदी करणाऱ्या ग्राहकांना प्रत्येक आठवड्यात बक्षिसे जिंकण्याची संधी मिळणार आहे.
पाहिले बक्षिस फॅशन डीएक्स राम आळी इथल्या दुकानातून खरेदी केलेल्या ग्राहकाला लागले
दुसरे बक्षिस आणि तिसरे बक्षीस सुंदर कलेक्शन राम आळी आणि आर्वी रेडिमेड नाचणे रोड ह्या दुकानात खरेदी करणाऱ्या ग्राहकांना लागले

या महाभव्य सोडतीचा पहिला ड्रॉ रविवारी सकाळी 11 वाजता काढण्यात आला. यावेळी जेष्ठ उद्योजक प्रभाकर भिंगार्डे, शहर व्यापारी महासंघाचे माजी अध्यक्ष उदय पेठे आणि जेष्ठ व्यापारी आनंदशेठ विरकर यांच्या हस्ते ही सोडत काढण्यात आली. या सर्व सोडतीचे व्हिडिओ शूटिंग देखील करण्यात आले आहे. सायंकाळी 5 वाजता मारुतीमंदिर सर्कल येथे बक्षीस वितरण समारंभ झाला.

या कार्यक्रमास रत्नागिरी तहसीलदार शशिकांत जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत बक्षिस वितरण करण्यात आले. यावेळी उदय पेठे, आनंदशेठ विरकर
गणेश भिंगार्डे, अध्यक्ष शहर व्यापारी महासंघ,निखिल देसाई अध्यक्ष तालुका व्यापारी महासंघ, हेमंत वणजू ,उपाध्यक्ष राजकुमार जैन,सौरभ मलुष्टे आदी व्यापारी महासंघाचे सदस्य उपस्थित होते.

स्थानिक बाजारपेठेलाच मोठी करा: तहसिलदार शशिकांत जाधव

नागरिकांनी ऑनलाइन किंवा कोणत्याही मोठ्या कंपन्यांकडे धाव न घेता स्थानिक बाजारपेठेतूनच खरेदी करावी. कोरोना सारख्या कठीण काळात हीच स्थानिक बाजारपेठ आणि स्थानिक व्यापारी प्रत्येकाच्या मदतीला आला होता. व्यापाऱ्यांच्या आताच्या कालावधीत ग्राहकांनी स्थानिक व्यापाऱ्यांच्या पाठीशी राहावे असे आवाहन तहसीलदार जाधव यांनी यावेळी केले.