रनपची नवी प्रशासकीय इमारत उभी राहण्याचा मार्ग मोकळा

कमी दराने काम करण्यावर निर्माण कंपनी राजी 

रत्नागिरी:- पालिकेने नेमलेल्या मे. अक्वॉटेक कन्सलटंट यांनी दिलेल्या अभिप्रायवरून पालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या वाढीव २०.८७ टक्के एवजी ९.६५ टक्के दर देण्यास आजच्या तातडीच्या विशेष सभेत सर्वानुमते मंजूर देण्यात आली. भाजपने याला विरोध करून हा विषय लावून धरला होता. त्याला शिवसेनेनेही पाठिंबा देत विरोध केल्याने गेल्या सभेत पालिकेवर आर्थिक भार पडणाऱ्या या ठरावाला विरोध झाला. आता ११ टक्के कमी वाढीव दर मंजूर केल्याने दीड कोटी रुपयाचा पालिकेवरील बोजा कमी झाला आहे. त्यामुळे  आता पालिकेची नवीन प्रशासकीय इमारत होण्यास मार्ग मोकळा झाला आहे.  

पालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे अंदाजपत्र १४ केटी २८ लाख ५४ हजार आहे. २०१९-२० मधील हे काम आहे. मात्र कोरोनामुळे ते पुढे गेले. या कामाच्या दुसऱ्यांदा काढलेल्या निविदा प्रक्रियेला प्रतिसाद मिळाला. २ निविदा आल्या होत्या, त्यामधील स्पेकट्रम इन्फ्रास्ट्रक्चर यांना तांत्रिक लखोटा परिपूर्ण नसल्याने त्यांना वित्तीय लखोटा उघडण्यात आला नाही. दुसऱे मक्तेदार निर्माण इन्फ्रास्ट्रक्चर यांची अंदाजपत्रकीय दरापेक्षा २०.८७ टक्के वाढीव दराची निविदी प्राप्त झाली.  यामुळे इमारतीचे अंदाजपत्र १७ कोटीच्यावर जात होते.

नगरविकास खात्याने या इमारतीला निधी देताना ५ कोटी रुपये दिला होता. त्या उपर जो खर्च येईल तो पालिकेने आपल्या स्वतःच्या फंडातून उभा करावा, अशा स्पष्ट सुचना दिल्या होत्या. त्यामुळे ३ कोटीचा वाढीव बोजा पालिकेवरच पडणार होता. त्यामुळे सभागृहात भाजपने या वाढीव दराला विरोध केला. त्याचबरोबर सेनेचे गटनेते राजन शेट्ये यांनीही या ठरावाला विऱोध दर्शविला. पालिकेने नेमलेल्या मे. अक्वॉटेक कन्सलटंट कंपनीने जास्तीत जास्त ९.६५ टक्के वाढीवदर देता येईल, असा सल्ला दिलो होता. त्यापलिकडे वाढीव दर देता येणार नाही, असे एकमत झाले. तसे निर्माण इन्फ्रास्ट्रक्चरला कळविण्यात आले. निर्माण कंपनीने माघार घेत ९.६५ टक्के दराने इमारतीचे काम करण्यास तयारी दर्शविली.
यावर निर्णय घेण्यासाठी आज तातडीची विशेष सभा बोलवाण्यात आली होती. विषयाचे वाचन झाल्यानंतर भाजपने या वाढीव दराला विरोध केला होता. त्यानंतर शिवसेनेनेही विरोध केल्याने कंपनी २० टक्के एवजी ९ टक्के दराने काम करण्यास तयार  झाली. यामुळे पालिकेचे सुमारे दीड कोटी रुपये वाचले. ९.६५ टक्के वाढीव दराने काम करण्यास सर्वांनी एकमतान मंजूरी दिल्यामुळे मी सर्वांचे आभार माणतो. हे काम
लवकरच सुरू होऊन आपला सर्वांना नवीन इमारतीमध्ये बसण्याची संधी मिळो, अशी इश्वरचरणी प्रार्थना करतो, असे मत व्यक्त करून नगराध्यक्ष बंड्या साळवी यांनी सभा संपल्याचे घोषित केले.