चिनी बनावटीची व्हिटीएस यंत्रणा असलेली रत्नागिरीतील दुसरी बोट ताब्यात

रत्नागिरी:– रत्नागिरीतील आणखी एका बोटीवर देवगड येथे कारवाई करण्यात आली आहे. सोमवारी सकाळी ११.१५ वा. सुमारास आचरा लाईटहाऊससमोर ८ नॉटीकल मैल येथे चिनी बनावटीची व्हीटीएस यंत्रणा असलेली रत्नागिरी येथीलच अल हज अब्दूल्ला ही दुसरी नौका पकडण्यात आली असून या नौकेला देवगड बंदरात आणून मत्स्यव्यवसाय विभागाच्या ताब्यात देण्यात आले.

चिनी बनावटीची व्हीटीएस् यंत्रणा असलेली दुसरी नौका देवगड सागर सुरक्षा शाखेच्या पोलिसांनी आचरा समुद्रात पकडली असून ही नौका कारवाईसाठी देवगड बंदरात आणली आहे.रविवारी पकडलेल्या नौेकेवरील मासळीचा लिलाव केवळ ५७२० रूपये एवढा झाला असून पुढील कारवाईसाठी तहसिलदारांकडे प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे.दरम्यान सोमवारी केलेल्या कारवाईमध्ये सागरी सुरक्षा शाखेचे पोलिस उपनिरिक्षक जितेंद्र साळूंखे, विक्रांत कुंभार, संपत जगताप, अ‍ेएस्आय प्रेमनाथ टेकाळे, पोलिस नाईक बिर्जे, पोलिस शिपाई यांचा समावेश होता.ही नौका रत्नागिरी येथील असून या नौकेवर एकूण ४२ कर्मचारी आहेत. ही नौका मत्स्यव्यवसाय विभागाच्या ताब्यात असून त्यांनी देवगड बंदरात नौका अवरूध्द केली आहे.