कोरोनाची लाट ओसरली; 1 हजार 755 चाचण्यांमध्ये केवळ 37 पॉझिटिव्ह रुग्ण 

रत्नागिरी:- सोमवारी आलेल्या अहवालानुसार करण्यात आलेल्या 1 हजार 755 कोरोना चाचण्यांमध्ये केवळ 37 पॉझिटिव्ह रुग्ण भेटले आहेत. तर 1 हजार 718 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. 24 तासात एका रुग्णाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. 

जिल्ह्यात 24 तासात 54 रुग्ण उपचाराअंती कोरोनामुक्त झाले असून आतापर्यंत 74 हजार 660 रुग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. जिल्ह्यात कोरोनामुक्तीचे प्रमाण वाढून  96.01 टक्के आहे. नव्याने 37 पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने एकूण बाधित रुग्णसंख्या 77 हजार 763 इतकी झाली आहे. 

कोरोनाने नव्याने एका मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 2 हजार 418 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. जिल्ह्याचा मृत्युदर 3.11 टक्के आहे. जिल्ह्यात गृह विलगीकरणात 377 तर संस्थात्मक विलगीकरणात 279 रुग्ण उपचार घेत आहेत.