जिल्ह्यात 51 ॲक्टिव्ह कंटेन्मेंट झोन; नव्याने केवळ 44 पॉझिटिव्ह रुग्ण

रत्नागिरी:- जिल्ह्यात दररोज नव्याने सापडणाऱ्‍या कोरोना बाधितांचा आकडा स्थिर झाला असून अतिदक्षता आणि ऑक्सिजन बेडवरील बाधितांची संख्येतही घट होऊ लागली आहे.तसेच कोरोना ॲक्टिव्ह कंटेन्मेंट झोनची संख्याही 51 आहे. रविवारी दिवसभरात जिल्ह्यात 44 कोरोना बाधित सापडले असून 66 जण कोरोनामुक्त झाले. दोन मृतांची ऑनलाईन पोर्टलवर नोंद झाली आहे. 

जिल्ह्यात 24 तासात 66 रुग्ण उपचाराअंती कोरोनामुक्त झाले असून आतापर्यंत 74 हजार 606 रुग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. जिल्ह्यात कोरोनामुक्तीचे प्रमाण 95.99 टक्के आहे. नव्याने 44 पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने एकूण बाधित रुग्णसंख्या 77 हजार 726 इतकी झाली आहे. 

कोरोनाने नव्याने 2 मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. दोन्ही मृत्यू 24 तासातील  आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 2 हजार 417 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. जिल्ह्याचा मृत्युदर 3.11 टक्के आहे. जिल्ह्यात गृह विलीगिकरणात 418 तर संस्थात्मक विलीकरणात 225 रुग्ण उपचार घेत आहेत.