जिल्ह्यात 24 तासात 71 जण कोरोना  पॉझिटिव्ह; 4 रुग्णांचा मृत्यू 

रत्नागिरी:- शनिवारी आलेल्या अहवालानुसार केवळ 71 कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 4 रुग्णाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. 

जिल्ह्यात 24 तासात 259 रुग्ण उपचाराअंती कोरोनामुक्त झाले असून आतापर्यत 73 हजार 907 रुग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. जिल्ह्यात कोरोनामुक्तीचे प्रमाण 95.59 टक्के आहे. नव्याने 71 पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने एकूण बाधित रुग्णसंख्या 77 हजार 317 इतकी झाली आहे. 

कोरोनाने नव्याने 4 मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये 24 तासात 3 तर यापूर्वीच्या एका मृत्यूची नोंद आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 2 हजार 386 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. जिल्ह्याचा मृत्युदर 3.09 टक्के आहे. जिल्ह्यात गृह विलगीकरणात 473 तर संस्थात्मक विलगीकरणात 400 रुग्ण उपचार घेत आहेत.