कोकण रेल्वे मार्गावर 16 ते 20 सप्टेंबर दरम्यान धावणार स्पेशल ट्रेन; चाकरमान्यांचा परतीचा प्रवास होणार सुखकर 

रत्नागिरी:- गणेशोत्सव साजरा करण्यासाठी कोकणात आलेल्या चाकरमान्यांचा परतीचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी कोकण रेल्वे प्रशासनाने या मार्गावर दहा स्पेशल गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे.16 ते 20 सप्टेंबर दरम्यान या मार्गावर या गाड्या चालविल्या जाणार आहेत.

10 सप्टेंबर पासून सुरु झालेल्या गणेशोत्सवासाठी कोकणात हजारोच्या संख्येने चाकरमानी दाखल झाले आहेत. गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांची गर्दी लक्षात घेत कोकण रेल्वे प्रशासनाने कोकण रेल्वे मार्गावर स्पेशल गाड्या चालविल्या होत्या. या गाड्यांमुळे हजारो गणेशभक्त गणेशोत्सवासाठी वेळेत आपापल्या गावी पोहचू शकले होते. 11 सप्टेंबर रोजी दीड दिवसांच्या गणरायांना निरोप दिल्यानंतर चाकरमान्यांचा परतीचा प्रवास सुरु झाला आहे. मंगळवार दिनांक 14 सप्टेंबर रोजी पाच दिवसांच्या गणरायांना निरोप दिल्यावर मोठ्या संख्येने चाकरमानी परतीच्या प्रवासाला निघणार आहेत. या दरम्यान कोकण रेल्वे मार्गावर चाकरमान्यांची होणारी गर्दी लक्षात घेत कोकण रेल्वेने 16 ते 20 सप्टेंबर या दरम्यान तब्बल दहा स्पेशल गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे.

चाकरमान्यांना परतीच्या प्रवासाला घेऊन निघणारी पहिली स्पेशल गाडी 16 सप्टेंबर रोजी सकाळी 5.20 वाजता मडगाव स्थानकावरून सुटणार असून ही गाडी पनवेल पर्यंत धावणार आहे. त्याच दिवशी सायंकाळी 5.20 वाजता पनवेल येथे पोहचणार आहे. या गाडीचा परतीचा प्रवास 19 सप्टेंबर रोजी सकाळी 6.50 वाजता सुरु होणार असून ही गाडी त्याच दिवशी सायंकाळी 8 वाजता मडगाव येथे पोहचणार आहे. 20 डब्बे असलेली ही गाडी करमाळी, थिविम, सावंतवाडी, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, नांदगाव, वैभववाडी, राजापूर, विलवडे, आडवली, रत्नागिरी, संगमेश्वर, आरवली, सावर्डे, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा स्थानकांवर थांबणार आहे.पनवेल-रत्नागिरी ही स्पेशल गाडी 16 सप्टेंबर रोजी सायं. 6.30 वाजता पनवेल येथून सुटून दुसऱ्या दिवशी मध्यरात्री 2 वा. रत्नागिरीला पोहोचेल. परतीच्या प्रवासात 17सप्टेंबर रोजी सकाळी 9.30 वाजता रत्नागिरी येथून सुटून सायंकाळी 5.20 वा. पनवेलला पोहोचेल. 20 डब्यांच्या स्पेशलला रोहा, माणगाव, वीर, करंजाडी, चिपळूण, सावर्ड, आरवली, संगमेश्वर आदी स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत.

17 सप्टेंबर रोजी पनवेल-कुडाळ दरम्यान स्पेशल गाडी धावणार आहे. पनवेल येथून ही गाडी सायं. 6.30 वाजता सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे 5 वाजता कुडाळला पोहोचेल. 18 सप्टेंबर रोजी कुडाळ येथून सायं. 7.50 वाजता परतीच्या प्रवासाला निघून दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वा. पनवेलला पोहोचेल. ही गाडी देखील 20 डब्यांची असून ही गाडी रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डे, आरवली, संगमेश्वर, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर, वैभववाडी, नांदगाव, कणकवली, सिंधुदुर्ग आदी स्थानकांवर थांबणार आहे.16 सप्टेंबर रोजी आणखी एक स्पेशल गाडी मडगाव -पनवेल दरम्यान धावणार आहे. ही गाडी 16 सप्टेंबर रोजी दुपारी 2.40 वाजता मडगाव येथून सुटून दुसऱ्या दिवशी 2.50 वाजता पनवेलला पोहोचेल. 19 सप्टेंबर रोजी पनवेल येथून सायं. 6.10 वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वा. मडगावला पोहोचेल. 20 डब्यांची ही गाड़ी करमाळी, थिविम, सावंतवाडी, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, नांदगाव, वैभववाडी, राजापूर, विलवडे, आडवली, रत्नागिरी, संगमेश्वर, आरवली, सावर्डे, चिपळूण, खेड, वीर, माणगाव, रोहा स्थानकांवर थांबणार आहे.

पनवेल-रत्नागिरी ही स्पेशल गाडी 17 सप्टेंबर रोजी धावेल. पनवेल येथून सकाळी 4.45 वा. सुटून 12 वा. रत्नागिरीला पोहोचेल. परतीच्या प्रवासात दुपारी 3 वा. रत्नागिरी येथून सुटून रात्री 11.10 वा. पनवेलला पोहोचेल. 20 डब्यांची पनवेल-रत्नागिरी स्पेशल 18 सप्टेंबर रोजी धावणार आहे. रात्री 12 वाजून 15 मिनिटांनी पनवेल येथून सकाळी 7.30 वाजता रत्नागिरीला पोहोचेल. 20 डब्यांची पनवेल-कुडाळ स्पेशल 18 सप्टेंबर रोजी धावेल. पनवेल येथून सायं. 6.30 वाजता सुटून पहाटे 5 वाजता कुडाळला पोहोचेल. परतीच्या प्रवासात 19 सप्टेंबर रोजी कुडाळ येथून सकाळी 7 वा. सुटून सायं. 5.15 वाजता पनवेलला पोहोचेल. मडगाव-पनवेल स्पेशल 19 सप्टेंबर रोजी सायं. 6 वाजता मडगाव येथून सुटेल.दुसऱ्या दिवशी पहाटे 4.40 वाजता पनवेलला पोहोचेल. परतीच्या प्रवासात 20 सप्टेंबर रोजी पनवेल येथून पहाटे 5.35 वाजता सुटून सायं. 6.45 वा. मडगावला पोहोचेल. या स्पेशलला 22 डबे जोडण्यात येणार आहेत. मडगाव-विलासपूर स्पेशल 21 रोजी धावेल. ही 20 डब्यांची स्पेशल मडगाव येथून रात्री 8 वा. सुटून तिसऱ्या दिवशी मध्यरात्री 3.10 वाजता विलासपूरला पोहोचेल.