प्रधानमंत्री मातृ वंदना योजना अंतर्गत लाभ देण्यासाठी विशेष सप्ताह

रत्नागिरी:- प्रधानमंत्री मातृ वंदना योजना अंतर्गत जिल्हयात 7 सप्टेंबर पर्यंत ‘मातृ वंदना सप्ताह’ राबविण्यात येत आहे. या सप्ताह मध्ये पात्र लाभार्थीना लाभ देणेसाठी विशेष मोहीम राबविण्यात यावी असे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ . इंदूराणी जाखड यांनी दिले आहेत.  
 

प्रधानमंत्री मातृ वंदना योजने अंतर्गत संपूर्ण देशात 1 ते 7 सप्टेंबर 2021 या कालावधीत मातृ वंदना सप्ताह राबविण्याबाबत शासनाकडून आदेशित करण्यात आलेले आहे. प्रधानमंत्री मातृ वंदना योजना हि केंद्र सरकारची महत्वाकांक्षी योजना आहे.
 

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना शहरी व ग्रामीण भागात लागू करण्यात आली आहे. या योजने अंतर्गत 1 जानेवारी 2017 रोजी किंवा त्यानंतर पहिल्यांदा ज्या माताची प्रसूती झाली आहे किंवा गर्भधारणा झाली असेल व त्यांनी शासनाने अधिसूचित केलेल्या नोंदणी केली असेल, अशाच पात्र महिलांना प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचा लाभ पहिल्या जिवंत अपत्या साठी पुढील प्रमाणे देण्यात येतो. प्रधानमंत्री मातृ वंदना योजने अंतर्गत लाभार्थाला पाच हजार (5000/- रुपयेचा लाभ त्यांच्या आधार संलग्नित बँक किंवा पोस्ट खात्या वर वर्ग करण्यात येतो. 
 

हि योजना शासकीय सेवेत असणाया माता वगळून सर्व स्तरातील मातांना देय आहे. रत्नागिरी जिह्या मध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्ण्यालय, जिल्हा रुग्णालय सर्व शासकीय संस्थेत माहितीपत्रकाचे वाटप तसेच जास्तीत जास्त पात्र लाभार्थी लाभ देणे साठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील पात्र लाभार्थीने या योजनेचा लाभ घाव असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव, उपाध्यक्ष तथा आरोग्य सभापती उदय बने, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीमती इंदुराणी जाखड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अनिरुध्द आठल्ये, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. श्रीमती संघमित्रा फुले, जिल्हा कार्यक्रम समन्वयक प्रवीण डुब्बेवार यांनी केले आहे.   

लाभ देण्याचे एकूण तीन टप्पे आहेत. पहिला टप्पा एक हजार रुपये 1000 / -रुपये असून मासिक पाळीच्या शेवटच्या तारखे पासून 150 दिवसात गर्भधारणा नोंदणी केल्या नंतर देण्यात येतो. दुसरा टप्पा दोन हजार रुपये 2000 / – रुपये किमान एकदा प्रसुतीपूर्व तपासणी केल्यास गर्भधारणेचे सहा महिने पूर्ण झाल्यास देण्यात येतो. तिसरा टप्पा दोन हजार रुपये 2000 / – रुपये प्रसूतीनंतर अपत्याची जन्म नोंदणी व बालकास लसिकरणाचा पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर देण्यात येतो.