रत्नागिरीच्या मनोरुणालयात 20 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह; आरोग्य यंत्रणा अलर्ट

रत्नागिरी:- जिल्ह्यात कोरोनाचा आलेख कमी होत असताना रत्नागिरी शहरातील मनोरुग्णालयात एकाच ठिकाणी 20 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. या घटनेने आरोग्य यंत्रणेत खळबळ उडाली असून प्रत्येक रुग्ण आणि कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात येणार आहे.

रत्नागिरी प्रादेशिक मनोरुणालयातील तब्बल 20 रुग्णाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आरोग्य विभाग पुन्हा एकदा चांगलाच अलर्ट झाला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना संख्या आटोक्यात येत असताना या आठवड्यात रत्नागिरी प्रादेशिक मनोरुग्णालयातील 20 मनोरुग्णांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. जवळपास सर्व रुग्णांचे पहिले लसीकरण पार पडले आहे. या सर्व रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे आढळून आली असून त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत आहे. येथील महिला रुग्णालयात या सर्वांवर उपचार सुरू असल्याची माहिती मनोरुग्णालयाकडून देण्यात आली.

कोरोना काळातही रुग्णांना उपचारासाठी दाखल करून घेण्याचे काम सुरू होते आताही दररोज कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातून रुग्ण उपचारासाठी दाखल होत आहेत मात्र दाखल करण्यापूर्वी त्यांचे आरटीपीसीआर रिपोर्ट पाहिले जातात मात्र आता कोरोना ची लागण नेमके कशी झाली असेल तर याबद्दल साशंकता व्यक्त केली जात आहे.