रत्नागिरी शहरात शिवसैनिक आक्रमक

भाजपच्या जनआशिर्वाद यात्रेचे बॅनर फाडले

रत्नागिरी:- नारायण राणे यांच्या  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधातील व्यक्तव्या नंतर संपूर्ण महाराष्ट्रात शिवसैनिक पेटले असताना याचा पडसाद रत्नागिरीत देखील पाहायला मिळाले आहेत. मंगळवारी शिवसैनिकांनी शहरात मारुती मंदिर येथे जोरदार आंदोलन करत भाजपच्या जनआशिर्वाद यात्रेचे बॅनर फाडले. 

शहरात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या स्वागता साठी लावलेले बॅनर फाडण्यात आले व नारायण राणे यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. नारायण राणे यांच्या व्यक्तव्याचा जोरदार निषेध करण्यात आला. मुख्यमंत्री व पक्ष प्रमुख यांच्या विरोधात वक्तव्य केल्याप्रकरणी शिवसेना रत्नागिरी ह्यांनी सह संपर्कप्रमुख राजेंद्र महाडिक व राजापूर- लांजा- साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ.राजन साळवी, विधानसभा क्षेत्रप्रमुख प्रमोद शेरे, उप जिल्हाप्रमुख महेश म्हाप, संजय साळवी, तालुकाप्रमुख प्रदीप उर्फ बंड्या साळवी बिपीन बंदरकर ह्यांच्या नेतृत्वाखाली रत्नागिरी शहरामध्ये जोरदार आंदोलन करण्यात आले.