चुकीचे वक्तव्य, त्याचा जाहिर निषेध- ना. सामंत

रत्नागिरी:- नारायण राणे केंद्रीय मंत्री असताना केलेल्या वक्तव्याचा मी जाहीर निषेध करतो. जी काही पोलिस खात्याने कारवाई केली ती कायदेशीर झाली. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनीही सांगितले की, ना. राणेंच्या वक्तव्याच्या पाठी आम्ही नाही. त्याचे समर्थन आम्ही करणार नाही. भाजपचे नेते आहेत म्हणून त्यांच्या मागे राहणार. म्हणजे त्यांचे हे वक्तव्य पुर्णतः चुकीचे आहे. म्हणून त्यांनी केलेले वक्तव्य निषेधार्ह आहे आणि मी त्याचा जाहिर निषेध करतो, अशी प्रतिक्रिया उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली.