जिल्ह्यात 24 तासात 157 नवे कोरोना बाधित; 9 मृत्यूची नोंद

रत्नागिरी:- मागील 24 तासात 157 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. तर 9 रुग्णाचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. 

नव्याने 157 पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने जिल्ह्यात कोरोना बाधितांची एकूण संख्या 74 हजार इतकी झाली आहे. 24 तासात 5 हजार 966 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून आतापर्यंत 5 लाख 94 हजार 297 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. आतापर्यँत 69 हजार 988 रुग्ण बरे झाले आहेत. तर 24 तासात 97 रुग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. 
 

जिल्ह्यात नव्याने 9 मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृृृत 9 पैकी 24 तासातील 8 त्यापूर्वीचे 1 असे 9 मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 2 हजार 186 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. जिल्ह्याचा मृत्युदर 2.97 तर रिकव्हरी दर 94.58 टक्के आहे.