गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात लसीचा पुरवठा वाढवा

ॲड.अनिल परब मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार 

रत्नागिरी:- गणपतीच्या सणात कोकणात येणार्‍या चाकरमानी मंडळींचे प्रमाण वाढणार आहे. त्यामुळे रत्नागिरी व सिंधुदूर्ग जिल्ह्याचा कोरोना लसीकरणाचा कोटा वाढवून देण्याची विनंती मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे करणार असल्याची माहिती पालकमंत्री अ‍ॅड. अनिल परब यांनी दिली.

जिल्ह्यातील कोविड स्थितीचा आढावा देखील या बैठकीत घेण्यात आली. यावेळी जिल्ह्यातील कोरोना स्थितीची माहिती त्यांनी घेतली. तसेच मोठया प्रमाणावर तपासण्या होवून देखील रुग्णसंख्या कमी होत नाही. याबाबत प्रशासनाने अधिक लक्ष द्यावे असे निर्देश त्यांनी दिले. यावेळी चिपळूणमधील खाजगी कोविड रुग्णालयांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तिसर्‍या लाटेची शक्यता असल्यामुळे ती यंत्रणा पून्हा कार्यान्वीत होणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनास ते ताब्यात घेऊन पून्हा कार्यान्वीत करण्याचे निर्देश द्यावेत अशी सूचना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली.
अतिवृष्टीतील परिस्थितीचा आढावा पालकमंत्री अ‍ॅड. परब यांनी घेतला. खेड शहरातील स्वच्छतेचे काम १०० टक्के पूर्ण झाले असून चिपळूणमधील ७० टक्के झाले आहे. या कामाला गती द्यावी अशा सूचना करुन पालकमंत्री यांनी केल्या आहेत. चिपळूण आणि खेड मधील वीज पुरवठा तसेच पिण्याच्या पाण्याचा पुरवठा युध्दपातळीवर काम करुन यापूर्वीच सुरु करण्यात आला आहे.